दिवाळी सणाच्या पार्श्वभूमीवर अधिकचे भाडे आकारणी करणाऱ्या खासगी वाहतुकदारांविरुद्ध अशी करा तक्रार

Pune : दिवाळी सणाच्या (Diwali Festival) पार्श्वभूमीवर खासगी वाहतूकदारांनी प्रवाशाकडून निर्धारित केलेल्या भाड्यापेक्षा अधिक भाडे आकारणी केल्यास प्रवाशांनी पिंपरी-चिंचवड उप प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या [email protected] या ईमेल पत्त्यावर तक्रारी किंवा पुरावे सादर करण्याचे आवाहन करण्यात येत आहे.

खाजगी प्रवासी बसेसची सेवा पुरविणारे वाहतूकदारांनी संबंधित मार्गावर महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्यावतीने वाहतूक सेवेकरीता आकारण्यात येणाऱ्या भाड्याच्या कमाल दीडपटपर्यंत भाडे आकारता येईल. त्यापेक्षा अधिक भाडे आकारणी करणाऱ्या खासगी बसेसवर मोटार वाहन कायद्यांतर्गत कारवाई करण्याचे आदेश मोटार वाहन निरीक्षक यांना देण्यात आलेले आहेत.

अधिक भाडे आकारल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यास किंवा आढळून आल्यास अशा वाहतूक पुरवठादारांवर मोटार वाहन कायद्याच्या विविध कलमांतर्गत खटला दाखल करण्यात येणार आहे, अशी माहिती पिंपरी-चिंचवडचे उप प्रादेशिक परिवहन अधिकारी अतुल आदे यांनी दिली आहे.

महत्वाचे बातम्या-

ते सर्वजण प्लॅनिंग करून माझ्या जीविताला हानी करण्याच्या हेतूने आले होते; प्रकाश सोळंके यांनी सांगितली आपबीती

मनोज जरांगे पाटील आणि सकल मराठा समाजाला मुख्यमंत्र्यांनी दिले धन्यवाद; म्हणाले,….

राज्य सरकारला 2 जानेवारीची डेडलाईन; अखेर मनोज जरांगे यांचं उपोषण मागे