आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याने अडसूळ यांचा राजीनामा

मुंबई : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पाडली आहे. अनेक आमदार शिंदे यांच्या सोबत गेले आहेत तर आता आणखी काही मोठे नेते देखील साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. या पार्श्व्बुमीवर शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ (Anandrao Adsul) यांचा शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे.

शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Shiv Sena chief Uddhav Thackeray) यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. ईडीने (ED) केलेल्या कारवाईवेळी तसंच आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत आनंदराव अडसूळ यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे. आनंदराव अडसूळ यांचा मुलगा अभिजीत अडसूळ (Abhijeet Adsul) हा एकनाथ शिंदे गटासोबत अगोदरपासूनच आहे. आता अडसूळ यांनी देखील राजीनामा दिला आहे. मात्र आनंदराव अडसूळ शिंदे गटात जाणार की नाही याबाबत अद्याप स्पष्टता नाही.

सिटी कोऑपरेटिव्ह बँक (CITY CO-OPERATIVE BANK) बँकेतल्या कथिक घोटाळ्याप्रकरणी अडसूळ यांची याआधीही चौकशी करण्यात आली होती. ज्यावेळी ईडीने कारवाई केली त्यानेळी पक्षाने साधी विचारपूस देखील केली नाही. तसेच आजरपण, अडचणीच्या काळात देखील पक्ष नेतृत्व पाठिशी न राहिल्याची भावना त्यांनी व्यक्त केली.