चंद्रकांत खैरे यांच्या कारभाराला कंटाळून ‘या’ बड्या नेत्याने केला शिंदे गटात प्रवेश

लातूर – शिवसेनेचे लातूरचे माजी जिल्हाप्रमुख बळवंत जाधव (Balwant Jadhav) यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटात प्रवेश केला आहे. उद्धव ठाकरेंबद्दल (Uddhav Thackeray) आपल्याला आदर आहे. त्यांच्याबाबत आदर कमी झाला नसून औरंगाबादचे माजी खासदार चंद्रकांत खैरे (Chandrakant Khaire) यांच्या कारभाराला कंटाळून मी शिंदे गटात सहभागी होत असल्याचं बळवंत जाधव यांनी सांगितले.

खैरे यांच्या नेतृत्वावर मी नाराज आहे. त्यांनी लातूरमध्ये शिवसेनेला कमी करण्याचा प्रयत्न केला. उद्धव ठाकरेंबद्दल माझे प्रेम आणि आदर कायम राहील. शिवसेनेची ताकद वाढवण्यासाठी एकनाथ शिंदे (CM Eknath Shinde) यांनी पावले उचलली आहेत असं जाधव यांचं म्हणणं आहे. बळवंत जाधव हे माजी राज्यमंत्री दिवाकर रावते (Diwakar Raote) यांचे निकटवर्तीय मानले जाते.