Sunil Tatkare – सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आणि बहुजनांच्या हितासाठी ‘तो’ ऐतिहासिक निर्णय अजितदादांनी घेतला

Sunil Tatkare : काळानुसार वेळ… संदर्भ… नेतृत्व बदलत असते… त्या नेतृत्वाच्या पाठीमागे ताकद आणि शक्ती उभी राहत असते. आज अजित पवारच्या पाठीमागे महिलांची शक्ती…युवकांची शक्ती…अल्पसंख्याक समाजाची शक्ती… उभी राहिली असून हीच ताकद आगामी लोकसभेच्या निवडणूकीत आपल्या सर्वांना अजित पवारान  च्या मागे उभी करायची आहे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांनी छत्रपती संभाजी नगर येथील मेळाव्यात केले.

आज झालेल्या ऐतिहासिक मेळाव्याच्या माध्यमातून संपूर्ण चळवळ ही अजित पवाराच्या विचारामागे उभी राहिलेली पाहायला मिळाली.सत्तेसाठी नव्हे तर सत्यासाठी आणि बहुजनांच्या हितासाठी ऐतिहासिक निर्णय अजित पवार नी घेतला. त्यांच्या निर्णयाला राज्यातून मोठ्या प्रमाणात पाठबळ मिळाले आहे. धर्मनिरपेक्ष विचार… शाहू – फुले – आंबेडकरांच्या सामाजिक विचारापासून तसूभरही बाजूला न जाता एनडीएमध्ये सहभागी होण्याचा निर्णय आम्ही घेतला असेही सुनिल तटकरे म्हणाले.

मागील अनेक दिवस जे लोक अदृश्य शक्ती… अदृश्य शक्ती अशी आपल्यावर टिका करत आहेत त्यांना दाखवून द्यायचं की, केवळ शाब्दिक अर्थाने बोलत आलात मात्र या संविधानामागे ठामपणे उभा राहणारा नागरिक अजित पवाराच्या मागे या सभेच्या माध्यमातून उभा आहे. याच संविधानावर आधारीत राहूनच निवडणुक आयोग आणि विधानसभा अध्यक्षांनी निर्णय दिला ज्यातून राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष हा अजितदादांच्या नेतृत्वाखाली चालतोय असेही सुनिल तटकरे यांनी ठणकावून सांगितले.

संविधानाला छेद देण्याचा प्रयत्न मागील काही वर्षांपासून होतोय त्याला बळकटी आणण्याचे काम अजित पवारच्या नेतृत्वाखाली आपण सर्वजण करतोय याचे मनस्वी समाधान असल्याचे सुनिल तटकरे म्हणाले. देशात वीजेची… पाण्याची गरज… देशाला लागेल अशी दिशा डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिली. त्यासोबतच अनेक धर्मजाती, समाजांचा हा देश एकसंघ ठेवण्यासाठी नेमकं काय केले पाहिजे. त्यावेळी डॉ. बाबासाहेबांच्या नेतृत्वाखाली संविधान समिती निर्माण करण्यात आली. देशातील श्रीमंतांच्या मताला जे मूल्य आहे तेच मूल्य देशातील गोरगरीबाच्या व्यक्तीच्या मतालाही देण्याचे काम डॉ. बाबासाहेबांनी केले असेही सुनिल तटकरे यांनी सांगितले.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

देश अमृतकाळात वावरत असताना देशाच्या प्रजासत्ताक दिनाचाही अमृतकालखंड सुरु आहे. पण गेले ७५ वर्षे देशाची गौरवशाली संसदीय लोकशाही प्रणाली व्यवस्था जगाच्या पाठीवर अबाधित राहू शकली ती केवळ डॉ. बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या विचारामुळे याचे स्मरण आपण करणे आवश्यक आहे असेही सुनिल तटकरे यांनी स्पष्ट केले.

राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष घटनेच्या आधारे आपापल्यापरीने जनतेची सेवा करण्याचा प्रयत्न करतो. सर्वधर्मसमभाव आणि सामाजिक समता मनामध्ये ठेवून काम करण्याची मानसिकता आम्ही दाखवतो. यातून डॉ. बाबासाहेबांनी दिलेल्या विचाराला शक्ती कशी मिळेल याचा प्रयत्न होतो. महायुतीच्या माध्यमातून उद्याच्या भविष्याला अधोरेखित करण्याचे काम सर्व समाजाला एकत्र घेऊन राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातून केले जात आहे याला पाठबळ आपल्या सर्वांच्या माध्यमातून मिळावे अशी विनंतीही सुनिल तटकरे यांनी केली.

अजितदादांचे नेतृत्व तुम्ही सर्वजण अनेक वर्षे पाहत आहात. शब्दाचा पक्का असणारा नेता जेव्हा महाराष्ट्राच्या हितासाठी उभा राहतो तेव्हा त्याच्या मागे ताकद आणि शक्ती उभी करण्याचे काम तुम्हा आम्हाला करायचे अशी विनंती सुनिल तटकरे यांनी सर्व बहुजन कार्यकर्त्यांना केली.

आंबेडकरी चळवळ नेमकी काय… त्यातला विचार नेमका काय… त्या विचाराची धग मनामध्ये ठेवून भविष्यात कशी वाटचाल करायची त्यासाठी अजित पवारान शिवाय दुसऱ्या नेतृत्वाचा विचार नाही. त्यासाठी ‘घड्याळ तेच वेळ नवी’ हे ब्रीदवाक्य घेऊन काम केल्यावर नवे अजितपर्व उभे राहणार आहे असेही सुनिल तटकरे म्हणाले.

इतिहास हा बदलत असतो. कधीकाळी ८० सालात जे आमदार गेले असतील ते निवडून आले नसतील. पण आज केवळ निवडणूका होऊद्या अजित पवारच्या नेतृत्वाखाली राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सामोरे जाईल तेव्हा आजचे ४३ आमदार सोडाच पण त्यापेक्षा जास्त आमदार शंभर टक्के निवडून येतील हा नव्या अजितपर्वाचा विचार आपल्याला प्रस्थापित असा दृढनिर्धार सुनिल तटकरे (Sunil Tatkare ) यांनी व्यक्त केला.

या मेळाव्याच्या माध्यमातून जो ठराव मांडण्यात येईल त्याची अंमलबजावणी करण्याचे काम महायुती सरकारच्या माध्यमातून होईलच त्यासोबतच राष्ट्रवादी काँग्रेसच्या माध्यमातूनही होण्यासाठी आम्ही सारे कटीबद्ध आहोत असे आश्वासनही सुनिल तटकरे यांनी दिले. या मेळाव्यामध्ये महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे यांनी आपले विचार मांडले.

संविधानाच्या उद्देशिकेचे वाचन करुन मेळाव्याला सुरुवात करण्यात आली. या मेळाव्याला राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष खासदार सुनिल तटकरे, महिला आयोगाच्या अध्यक्षा रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, आमदार विक्रम काळे, आमदार सतीश चव्हाण, आमदार अमोल मिटकरी, माजी आमदार अमरसिंह पंडित, सामाजिक न्याय सेल प्रदेशाध्यक्ष सुनील मगरे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, ओबीसी सेलचे प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, शहराध्यक्ष अभिजित देशमुख, आदींसह सामाजिक न्याय सेलचे सर्व जिल्हाध्यक्ष, कार्याध्यक्ष व पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

Lok Sabha Elections 2024 | भाजप उमेदवारांची पहिली यादी आठवडाभरात येणार; जाणून घ्या कुणाचा असेल यात समावेश

अजय बारसकरवर महिलेच्या विनयभंगाच्या प्रकरणाचा दवाब आणला, सरकारने हा ट्रॅप रचला – Manoj Jarange

MNS-BJP Alliance | मनसे-भाजप युती जवळपास निश्चित, लोकसभेच्या दोन जागाही ठरल्या?