‘विदर्भातील शिवसेनेचे 70 टक्के खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी शिंदे यांच्या बाजूने आहेत’

नागपूर : एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी केलेल्या बंडामुळे शिवसेनेत मोठी फुट पाडली आहे. अनेक आमदार शिंदे यांच्या सोबत गेले आहेत तर आता आणखी काही मोठे नेते देखील साथ सोडण्याच्या तयारीत आहेत. यातच आता पक्ष ही कुणाचीही खासगी मालमत्ता नाही, असे म्हणत नागपूरचे आमदार आशिष जैस्वाल (MLA Aashish Jaiswal) यांनी शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे ( Uddhav Thackeray ) यांना टोला लगावला आहे.

महाविकास आघाडी (MVA) सरकारमधून बंड करून 40 शिवसेना (Shivsena) आमदार बाहेर पडले. त्यामुळे सरकार बदलले. तर एकनाथ शिंदे यांच्या गटात येण्यासाठी आणखी अनेक नेते उत्सुक आहेत, असे जैस्वाल म्हणाले. विदर्भाचाच विचार केला तर शिवसेनेचे 70 टक्के खासदार, जिल्हा परिषद सदस्य, पदाधिकारी शिंदे यांच्या बाजूने आहेत, त्यामुळे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी यांचा गांभीर्याने विचार करावा, असा इशाराही जैस्वाल यांनी दिला आहे.

दरम्यान,एका बाजूला बंडखोर आमदार सेनेच्या नेत्यांवर टीका करत असताना शिवसेनेचे माजी खासदार आनंदराव अडसूळ यांनी देखील शिवसेना नेतेपदाचा राजीनामा दिला आहे. शिवसेना पक्षप्रममुख उद्धव ठाकरे यांना राजीनाम्याचे पत्र पाठवले आहे. ईडीने केलेल्या कारवाईवेळी तसंच आजारपणात साधी विचारपूसही न केल्याची खंत आनंदराव अडसूळ यांनी पत्राद्वारे व्यक्त केली आहे.