Manisha Kayande: नाना पटोले यांना कंटाळून काँग्रेसचे दिग्गज नेते पक्षाबाहेर पडत आहेत – मनीषा कायंदे

Manish Kayande – लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर (Loksabha Election 2024) संविधानाच्या नावाने बोंब  मारणाऱ्या काँग्रेसच्या  प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांच्यावर शिवसेना सचिव व प्रवक्त्या आमदार डॉ. मनीषा कायंदे यांनी काँग्रेस पक्ष बुडवीत असल्याची टीका केली आहे. नाना पटोले यांना कंटाळून काँग्रेसचे दिग्गज नेते पक्षाबाहेर पडत आहेत असा दावा देखील त्यांनी केलाय.

यावेळी बोलताना आमदार डॉ. मनीषा कायंदे म्हणाल्या, नाना पटोले काँग्रेसमधे आल्यापासूनच काँग्रेसची पीछेहाट होत आहे, संविधान वाचविण्याच्या गमजा  मारणाऱ्या नाना पटोले यांनी नेहमीच पक्षात स्वतःची मनमानी केली आहे. विधानसभा अध्यक्षपदाचा राजीनामा देताना त्यावेळचे तत्कालीन मुख्यमंत्री मा. उद्धवजी ठाकरे यांच्याशी कोणताही संवाद साधला नव्हता. काँग्रेस पक्ष एकिकडे दिल्लीत ‘न्यायपत्र’ जाहीर करतो आणि दुसरीकडे त्यांचे महाराष्ट्र राज्याचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले भर सभेत एका खासदाराच्या ‘मृत्यूची कामना’ करतात हि परस्पर विरोधी भूमिका दिल्लीतील काँग्रेसला कशी चालते?

आजमितीला अनेक दिग्गज नेते या नाना पटोले  यांच्या मनमानीला कंटाळून बाहेर पडत असून स्वतःवर बालंट आले कि नाना पटोले  लगेच ‘संविधान वाचवा’ अशी भूमिका घेऊन काँग्रेस श्रेष्टींच्या डोळ्यात धूळफेक करीत आहेत.  लोकसभेच्या सर्वच जागा निवडून देशाची संसदीय कार्यपद्धती बदलण्याचा मोंदीचा डाव आहे. तिस-यांदा मोदी निवडून आलेत तर लोकशाहीचा दारुण पराभव होईल. देशात हुकुमशाही राजवट निर्माण होईल अशी टीका करणाऱ्या  काँग्रेस नेते नाना पटोले यांची हुकूमशाही मात्र महाराष्ट्र काँग्रेसमधे सर्वसामान्य कार्यकर्त्याला सुद्धा दिसत आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या-

Sanjay Kokate | शिंदे गटाचे नेते संजय कोकाटे यांचा राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षात पक्ष प्रवेश

पोकळ घोषणा देणाऱ्या काँग्रेस आघाडीला पराभूत करा;आठवलेंचे पुदुचेरीत आवाहन

Mangaldas Bandal | मंगलदास बांदल यांची शिरुरची उमेदवारी रद्द, वंचित दुसरा उमेदवार देणार ?