खडकीतील गुरूद्वारासाठी पुनीत बालन यांच्याकडून २१ लाखांची देणगी, श्री गुरु सिंह सभा गुरूद्वाराचे करणार नूतनीकरण

Pune News : खडकी येथील गुरूद्वारा श्री गुरु सिंह (Gurdwara Shri Guru Singh) सभा परिसराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी पुनीत बालन ग्रुपचे (Puneet Balan Group) अध्यक्ष व युवा उद्योजक पुनीत बालन यांनी २१ लाख रुपयांची देणगी दिली आहे.

खडकी (Pune News ) गुरुद्वारा परिसर विकासाचा एक उद्घाटन सोहळा पुनीत बालन यांच्या हस्ते आणि माणिकचंद ऑक्सिरीच्या सीएमडी जान्हवी धारीवाल-बालन यांच्या उपस्थितीत नुकताच झाला. यावेळी पुनीत यांच्या मातोश्री इंद्राणी बालन यांच्या स्मृतीप्रित्यर्थ दगडी कोरीव नावाच्या फलकाचे उद्घाटनही बालन दापत्यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी बालन यांनी श्री गुरु सिंह सभा गुरुद्वाराच्या नूतनीकरणाच्या कामासाठी २१ लाख रुपयांची भरीव देणगी दिली. एल्फिन्स्टन रोड, खडकी येथील हा गुरुद्वारा अतिशय जुना आहे. बालन यांनी दिलेल्या देणगीतून गुरुद्वाराच्या नूतनीकरणाचे काम मार्गी लागणार आहे. बालन यांनी दिलेल्या या योगदानाबद्दल गुरुद्वारा श्री गुरु सिंह सभा खडकीचे अध्यक्ष गैरसगुरबीर सिंग ओबेरॉय (Gairsagurbir Singh Oberoi) आणि व्यवस्थापन समितीने त्यांचे आभार मानले. तर पवित्र अशा गुरुद्वाराच्या नुतनीकरणाच्या कामात या देणगीच्या माध्यमातून खारीचा वाटा मला उचलता आला याचे समाधान असल्याची प्रतिक्रिया पुनीत बालन यांनी दिली.

महत्वाच्या बातम्या

Medha Kulkarni | “..एवढीच मागणी मी पक्षाकडे केली होती”, राज्यसभेची उमेदवारी मिळाल्यानंतर मेधा कुलकर्णींची प्रतिक्रिया

Rajyasabha Election: राष्ट्रवादी काँग्रेसकडून प्रफुल पटेल राज्यसभेवर जाणार

महायुतीच्या उमेदवारांची यादी पाहून किव येते, भाजपसाठी जीव ओतलेल्यांनाच जागा नाही – Nana Patole