Rohit Pawar | “अजित पवार हे कर्णासारखे, मात्र बाजू चुकीची असल्याने…”, रोहित पवारांचे सूचक विधान

अजित पवार (Ajit Pawar) यांचा कर्ण असा उल्लेख करताना रोहित पवार (Rohit Pawar) म्हणाले, अजित पवार कर्णांसारखे आहेत, कर्ण होतकरू लढणारा एक व्यक्ती होता फक्त बाजू चुकीची होती, आणि बाजू चुकीची असल्यामुळे त्यांचा पराभव त्या ठिकाणी झाला. दादा सुद्धा तसेच आहेत, मात्र बाजू चिकीची निवडल्यामुळे त्यांचा पराभव होऊ शकतो, असे विधान शरदचंद्र पवार गटाचे आमदार रोहित पवार (Rohit Pawar) यांनी केले आहे.

अजित पवार हे असत्यतेच्या बाजूने आहेत हे खरं आहे. तीस-पस्तीस वर्षे तुम्ही पुरोगामी विचाराचे राहता, भाजपच्या विरोधात प्रचार करता, या आधी पवार साहेबांचे नाव भाषण करताना 100 वेळा येतं होत, इतका वर्ष पवार साहेबांसोबतच मिळालेल्या मतावर सत्ता भोगली आणि आता विरोधी पक्षात राहण्याची वेळ आल्यावर तुम्ही विचार बदलून सत्तेत जाता. ह्या गोष्टीला आपण असत्य म्हणतो. हे वक्तव्य मी सुनेत्रा काकीने टाकलेल्या पोस्टवरून केलं आहे, त्यांच्या पोस्टची भाषा बघता त्यांचे कन्सल्टंट हे भाजपच्या विचाराचे असावेत, असेही रोहित पवार म्हणाले.

अर्धवट चुकीची माहिती पोस्टमध्ये होती, श्रीकृष्णाचा विजय कधीचं झाला नव्हता, त्यांनी मार्गदर्शन केलं होतं, त्यांनी धर्म कधी सोडला नाही. त्या काळात जो अलिखित नियम होता ज्याला आजच्या भाषेत संविधान म्हणलं जायचं, त्याच्या बाजूने ते लढले. त्यामुळं मी ते विधान केलं होत, असेही रोहित पवार म्हणालेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

शिवसेना शिंदे गटाने जाहीर केली उमेदवारांची पहिली यादी, पाहा कोणाला मिळालं तिकीट?

Nana Patole | लोकशाही व संविधान वाचवण्यासाठी लोकसभा निवडणुकीत एकजुटीने लढण्याची गरज

Prakash Ambedkar | ‘वंचितच्या पाठीत खंजीर खुपसला’! आंबडेकरांचा संजय राऊतांवर हल्लाबोल