जोशुआ विरोधात दिग्गज मैदानात असले तरीही विजय जोशुआचाच होणार – तेजस्वी सूर्या

म्हापसा : गोवा विधानसभा निवडणुकीच्या प्रचार शेवटच्या टप्प्यात पोहचला असून आता प्रचार रंगात आला आहे. भाजप , काँग्रेस , आणि नव्याने गोव्यात दाखल झालेल्या आप आणि तृणमूल काँग्रेस या पक्षांत खरी लढत पाहायला मिळत आहे. निवडणूक अगदी जवळ येऊन ठेपल्याने आता सर्वच पक्षांनी जोर लावला असून अनेक बडे नेते गोव्यात प्रचारासाठी हजेरी लावत आहे.

आज ( ११ फेब्रुवारी ) म्हापसा विधानसभा मतदारसंघातील भाजपचे उमेदवार जोशुआ डिसोझा यांच्या प्रचार्थ भारतीय जनता युवा मोर्चाचे राष्ट्रीय अध्यक्ष आणि खासदार तेजस्वी सूर्या यांनी हजेरी लावली यावेळी त्यांनी जोशुआ डिसोझा यांच्या कामाचे तोंडभरून केले.

यावेळी माध्यमांशी बोलताना ते म्हणाले, भारतीय जनता पक्ष हा असा पक्ष आहे ज्यात सर्वसामान्य कार्यकर्त्याला देखील पक्षाचा राष्ट्रीय अध्यक्ष होण्याची संधी मिळू शकते. यावेळी म्हापसा मतदारसंघातून आमचे उमेदवार जोशुआ डिसुझा हे यावेळी गेल्यावेळी पेक्षा जास्त मताधिक्याने निवडून येतील असा मला विश्वास वाटतो. आमचा विजय केवळ म्हापसा मतदार संघातच होणार नसून गोवा देखील आम्ही जिंकू.

माझ्या विरोधात देखील अनेक दिग्गज लोकं मैदानात होते पण जनतेने मला आशीर्वाद दिला. माझ्याप्रमाणेच आमदार राम सातपुते यांच्याविरोधात देखील अनेक दिग्गज मैदानात असूनही त्यांनी विजय मिळवला. म्हापसा मतदार संघातील जनतेने यापूर्वीच जोशुआ यांना निवडून दिले असून त्यांचा लोकाभिमुख कारभार देखील पहिला आहे. मतदारांनी जोशुआ यांच्यावर आधीही विश्वास टाकला होता आणि यावेळी सुद्धा मतदार त्यांच्यावर पुन्हा एकदा विश्वास टाकतील असा मला विश्वास वाटतो असं तेजस्वी सूर्या यांनी म्हटले आहे.