‘मराठी प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढण्याचा अधिकार जितुद्दिन मियांना कोणी दिला आहे?’

Har Har Mahadev Controversy: ‘हर हर महादेव’ चित्रपटात इतिहासाची मोडतोड केल्याच्या निषेधार्थ राष्ट्रवादी काँग्रेसने (NCP) आक्रमक भूमिका घेतली. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रमुख नेते जितेंद्र आव्हाड (Jitendra Awhad) आणि कार्यकर्त्यांनी काल ठाण्यातील विवियाना मॉलमध्ये हर हर महादेव चित्रपटाचा चालू शो बंद पाडला. मात्र आव्हाड यांनी पाठ फिरवताच महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे (मनसे) ठाणे-पालघर जिल्हाप्रमुख अविनाश जाधव यांनी शो पुन्हा चालू केला. यामुळे आता राजकारण आणखीनच तापले आहे.

दरम्यान, मनसेचे नेते गजानन काळे यांनी देखील आव्हाड यांच्यावर तोफ डागली आहे. ते म्हणाले,उठता बसता लोकशाही,अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या गप्पा मारणारे पवारसाहेब व सुप्रियाताई या गुंड व दादागिरी करणाऱ्या जितेंद्र आव्हाड बद्दल काही बोलणार की नाही?आव्हाड यांना इतिहास तज्ञ असल्याचा सातबारा मिळाला आहे का? अफजल खानाचे उद्दातीकरण करणारे आव्हाड महाराष्ट्राला छत्रपती सांगणार?

मराठी प्रेक्षकांना मारहाण करुन बाहेर काढण्याचा अधिकार जितुद्दिन मियांना कोणी दिला आहे? सत्ता गेल्याच्या हतबलतेतून हे सुरू आहे का?सरकारने जितेंद्र आव्हाड व त्यांच्या चमचांवर कारवाई करावी.सिनेमाबद्दल मतभेद एका बाजूला पण ही गुंडगिरी चालणार नाही. सिनेमा पाहायचा की नाही हे लोक ठरवतील असं काळे म्हणाले.

पुढे ते म्हणाले,  तो भडवा निजामाची औलाद ओवेसी औरंगजेबाच्या थडग्यावर माथा टेकवायला आला होता त्यावेळी जितेंद्र आव्हाड व ब्रिगेड तोंडात मुग गिळून गप्प का होती ? छत्रपतींच्या स्वराज्याचा अपमान केला म्हणून त्या ओवेसीला का नाही रोखून बेड्या ठोकल्या?मराठी प्रेक्षकांवर दादागिरी करून काय शौर्य दाखवत आहात.