‘भेट शिवतीर्थ,दादरला झाली आणि चक्क धूर बारामती वरून निघाला …ताई आगे आगे देखो होता है क्या!’

मुंबई – राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस मनसे अध्यक्ष राज ठाकरेंच्या भेटीसाठी त्यांचं निवासस्थान ‘शिवतीर्थ’वर (Shivtirtha) पोहोचले होते. राज ठाकरेंवर नुकतीच शस्त्रक्रिया झाल्यामुळे तब्येतीची विचारपूस करण्यासाठी फडणवीस भेट घेत असल्याचं सांगण्यात येत होतं. मात्र सध्याच्या घडामोडींच्या पार्श्वभूमीवर राजकीय चर्चादेखील झाल्याची शक्यता आहे. दरम्यान या भेटीवरुन राष्ट्रवादी काँग्रेसच्या खासदार सुप्रिया सुळे ( NCP MP Supriya Sule) यांनी टोला लगावला आहे.

दरारा, प्रतिष्ठा या गोष्टी कर्तृत्व आणि कामातून होतात. कोणी कोणाच्या घरी गेले याच्यातून होत नाहीत. ज्यांच्याकडे एक आमदार आहे त्यांच्या घरी १०५ आमदार असणारा नेता जातो. याचे काय करणार तुम्ही? कोण कसा विचार करते हे मला माहिती नाही, असे सुप्रिया सुळे म्हणाल्या. महाराष्ट्राच्या राजकारणात, समाजकारणात जे काही सुरु आहे ते सर्वसामान्यांच्या हितासाठी नाही, फक्त स्वत:च्या स्वार्थासाठी सुरु आहे,अशी टीकाही सुप्रिया सुळे यांनी केली आहे.

दरम्यान, सुळे यांच्या या टीकेला मनसेचे नेते गजानन काळे यांनी प्रत्युत्तर दिले आहे. ते म्हणाले,हमारी अफवाह के धूंए वहीं से उठते हैं , जहाँ हमारे नाम से आग लग जाती हैं…!! भेट शिवतीर्थ,दादरला झाली आणि चक्क धूर बारामती वरून निघाला …ताई आगे आगे देखो होता है क्या! असं म्हणत त्यांनी सुळे यांना लक्ष्य केले आहे.