‘4 गाढवं एकत्र चरत असली, तरी हुकूमशहाला भीती वाटते की…’; शिवसेनेचा केंद्र सरकारवर निशाणा

मुंबई  : पार्लमेंटमध्ये ‘असंसदीय’ शब्दांचा वापर करण्यास निर्बंध येणार असल्याचं सांगितलं गेलं होतं. नंतर हा निर्णय मागे घेण्यात आला मात्र, असे शब्द सभागृहाच्या कामकाजातून काढून टाकले जातील, असं स्पष्ट करण्यात आलं. सोबतच संसद भवन परिसरात निदर्शने, धरणे, उपोषण, आंदोलन करण्याला केंद्र सरकारने बंदी घातली आहे.

दरम्यान,  यावरुनच आता शिवसेनेने सामनाच्या अग्रलेखातून (Saamana Editorial) केंद्र सरकारवर निशाणा साधला आहे (Shivesna Slams Central Government). यावेळी हरिशंकर परसाई यांच्या काही ओळींचाही उल्लेख करण्यात आला आहे. यात शिवसेनेनं म्हटलं, “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे’’ आजचं चित्र यापेक्षा वेगळं दिसत नाही!असं यात म्हटले आहे.

तुम्ही संसदेतही आम्ही सांगू तेच बोलायचे आणि संसदेबाहेरही आम्ही सांगतो तसेच वागायचे असा एकाधिकारशाहीचा वरवंटा फिरवला जात आहे. वास्तविक, सत्ताधाऱ्यांवर शब्दांची शस्त्रे भाजपाने जेवढी चालवली तेवढी कोणीच चालवली नसतील. लोकशाहीचे तेच तर वैभव आहे, तीच खरी शक्ती आहे. लोकशाही ही अशोक स्तंभावरील गुरगुरणाऱ्या सिंहासारखीच असायला हवी. पण सध्या राज्यकर्तेच गुरगुरत आहेत व संसदेचा भित्रा ससा करून ठेवला आहे. हरिशंकर परसाई यांनी म्हटले आहे, “हुकूमशहा हा एक डरपोक माणूस असतो. चार गाढवे एकत्र चरत असली तरी त्याला भीती वाटते की, आपल्याविरुद्ध कटकारस्थान चालले आहे।’’ आजचे चित्र यापेक्षा वेगळे दिसत नाही,” थेट कोणाचाही उल्लेक न करता शिवसेनेनं असा टोला लगावला आहे.