कौतुकास्पद! धार्मिक वातावरण गढूळ झालेल्या काळात मुस्लीम कारागिरांनी साकारले गणेश मंदिर

Ganesh Temple: सध्या जाती आणि धर्मावरुन राजकारण करण्याचे प्रमाण वाढले आहे. परंतु धार्मिक वातावरण गढूळ झालेल्या काळात सामाजिक समरसता सुखावणारी बाब म्हणजे, अहमदनगरमधील श्री विशाल गणेश मंदिराच्या उभारणीसाठी मुस्लिम कारागीर गेल्या दीड तपापासून घाम गाळत आहेत.

माळीवाड्यातील श्री विशाल गणेश मंदिराच्या जीर्णोद्धाराचे काम अंतिम टप्प्यात आहे. गेल्या अठरा वर्षांपासून हे काम सुरू आहे. त्यासाठी राजस्थानातील मुस्लिम कारागीर जीव तोडून मेहनत घेत आहेत. मुख्य कारागीर खालिद शेख यांच्या मार्गदर्शनाखाली मंदिराची उभारणी होत आहे.

विशाल गणेश मंदिराच्या जीर्णोद्धारास अठरा वर्षांपूर्वी प्रारंभ झाला. आतापर्यंत अठरा कोटी रुपये खर्च झाला. आणखी साडेतीन कोटी रुपयांची आवश्यकता आहे, असे देवस्थान ट्रस्टचे अध्यक्ष अॅड. अभय आगरकर सांगतात.

हे देवस्थान क वर्गात मोडते. मंदिराचा गाभारा पूर्ण झालाय. सभामंडपाचेही काम पूर्णत्वास गेलेय. कळस, भिंतींचेही काम झाले आहे. ७५ ते ८० टक्के काम झाले आहे. मंदिरात प्रवेश केल्यानंतर वरच्या बाजूच्या मंडपाचे काम बाकी आहे. पुजारी बसतात, त्या जागेवरील काम राहिले आहे. राजस्थानातील या मुस्लिम धर्मीय कारागिरांनी आतापर्यंत मशीद, दर्ग्यापेक्षा जास्त मंदिरेच उभारली आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!