धक्कादायक! प्रसिद्ध अभिनेत्याच्या मुलीने वयाच्या अवघ्या १६व्या वर्षी संपवलं आयुष्य

Vijay Antony Daughter : दाक्षिणात्य सिनेसृष्टीतून एक अतिशय धक्कादायक बातमी आली आहे. प्रसिद्ध तमिळ संगीतकार व अभिनेता विजय अँटोनीची १६ वर्षीय मुलगी मीरा हिने आत्महत्या केली आहे. निर्माता विजय अँटोनीची मुलगी मीरा हिने आज १९ सप्टेंबरच्या पहाटे आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. या बातमीने संपूर्ण इंडस्ट्रीला मोठा धक्का बसला आहे.

माध्यमांतील वृत्तांनुसार, मंगळवारी पहाटे चेन्नई तेनमपेट येथील त्यांच्या राहत्या घरी मीराने पहाटे ३ च्या सुमारास आत्महत्या केली. चेन्नईतील एका खासगी शाळेत ती इयत्ता १२वीत शिकत होती. विजय अँटोनी आणि त्यांची पत्नी फातिमा यांना मीरा आणि लारा या दोन मुली होत्या.

घरातील मदतनीसला मीरा तिच्या खोलीत गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळली, त्यानंतर तिला चेन्नईतील रुग्णालयात नेण्यात आले. मात्र, तिची तपासणी करणाऱ्या डॉक्टरांनी तिचा आधीच मृत्यू झाल्याचं सांगितलं.

https://youtube.com/shorts/m1O2hNRtM40?si=-rnzwHh-ABQEmDIU

महत्त्वाच्या बातम्या-
Ganesh Chaturthi 2023: बाप्पाच्या आगमनाची आतुरता संपली! पाहा गणपती स्थापनेसाठी शुभ मुहूर्त, पूजा पद्धत आणि साहित्य यादी

Ganesh Utsav 2023: भगवान गणेशाच्या ‘या’ १२ अवतारांचे आहे खास महत्त्व, वाचा बाप्पांबद्दल खास गोष्टी

Ganesh Chaturthi 2023: अशा प्रकारे घरी बनवा गणपतीचा आवडता मोदक, सर्व इच्छा होतील पूर्ण!

You May Also Like