एकदोन नव्हे तर तब्बल नऊ ठिकाणी केतकी चितळेवर गुन्हे दाखल

मुंबई  – प्रसिद्ध अभिनेत्री केतकी चितळे (Famous actress Ketki Chitale) ही सोशल मिडीयावर (Social media) चांगलीच सक्रीय असते. तिने केलेल्या काही पोस्टसवरून अनेकदा वाद देखील निर्माण झाल्याचे पाहायला मिळाले आहेत. आता देखील तिने एक पोस्ट केली असून या पोस्टवर अनेकांनी नाराजी दर्शविली आहे. नितीन भावे (Nitin Bhave) यांची मूळ ही पोस्ट आहे मात्र केतकीने ती पोस्ट शेअर केल्याने वाद निर्माण झाला आहे.

दरम्यान,  शरद पवारांबाबत (Sharad Pawar) आक्षेपार्ह फेसबुक पोस्ट(Facebook post) करणाऱ्या अभिनेत्री केतकी चितळेच्या अडचणीत वाढ झाली आहे. न्यायालयाने केतकी चितळेला 18 मे पर्यंत पोलीस कस्टडी सुनावण्यात आली आहे. विशेष म्हणजे कोर्टात केतकीने वकील घेतला नाही, तिनं स्वतः कोर्टात युक्तिवाद केला.

दरम्यान, केतकी चितळे हिच्याविरोधात राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी पोलिसांत तक्रारी करण्याचा सपाटा लावला आहे. आतापर्यंत एकूण नऊ ठिकाणी तिच्यावर गुन्हे दाखल करण्यात आले आहेत. आज मुंबईतील पवई पोलीस ठाण्यात(powai police station) आणि अमरावतीतल्या गाडगे नगर पोलीस ठाण्यात(gadge nagar police station amravati) आणि नाशिक सायबर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला. यापूर्वी कळवा(kalva police), पुणे(pune), पिंपरी-चिंचवड(pimpri chinchavad), धुळे(dhule), सिंधुदुर्ग, अकोला, मुंबईतील गोरेगाव पोलीस ठाण्यात केतकी चितळेविरोधात गुन्हा नोंदवण्यात आला होता.