गंगाखेड बस स्थानकाची दुर्दशा; चिखल,भटक्या कुत्र्यांच्या त्रासासह दुर्गंधीमुळे प्रवासी हैराण

गंगाखेड / विनायक आंधळे – गंगाखेड (Gangakhed) हे तालुक्याचं ठिकाण आहे यामुळे महाविद्यालयात शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांची संख्या येथे मोठ्या प्रमाणात आहे. रोज अनेक नागरिक एसटी बसने प्रवास करत आहेत. परंतु, सध्या गंगाखेड बस स्थानकास (Gangakhed Bus Stand) विविध समस्यांनी ग्रासले असल्यामुळे प्रवाशांना मूलभूत सुविधाही मिळताना दिसत नाहीत. सध्या पावसाचे दिवस असल्यामुळे पावसाचे पाणी (Rain water) खड्यात (Pothole) साचल्यामुळे सगळीकडे चिखल होत आहे. यामुळे, गंगाखेड शहरातील बस स्थानक परिसराची पार दुरअवस्था झाली आहे. यामुळे, नागरिक, विध्यार्थी, आणि येथील कर्मचाऱ्यांना येथे वावरण्यासाठी चांगलीच कसरत करावी लागत असल्याचं चित्र सध्या पाहायला मिळत आहे.

गंगाखेड शहर हे आजू – बाजूच्या परिसरासाठी मुख्य बाजारपेठेचं ठिकाण आहे. शहराच्या परिसरातील जवळपास शंभर हुन अधिक वस्ती, तांडा, खेडो-पाडीतून लोक नौकरी, खरेदी तसेच विद्यार्थी येथे शिक्षण घेण्यासाठी मोठ्या प्रमाणात येतात त्यांना याचा मोठ्या प्रमाणावर त्रास सहन करावा लागत आहे. बसस्थानकात बसण्यासाठी जागा आहे पण अस्वच्छता (Unsanitary) असल्यामुळे परिसरात सुटलेली दुर्गंधी (Stench), डुकरांचा, भटक्या कुत्र्यांचा तसेच अन्य प्राण्याचा येथे वावर, स्वच्छ पिण्याची पाण्याची (Clean drinking water) सोय नाही, कचरा पेटवल्यामुळे प्रवाशांना होणारा त्रास, असे चित्र सध्याला गंगाखेडच्या बस स्थानकावर आहे.

या ठिकाणी येणाऱ्या बस या खड्ड्यांतून जात असताना अनेक प्रवाशांच्या अंगावर खराब पाणी आणि चिखल (The Mud) उडत आहे. रोज हजारो प्रवासी बस स्थानकांवर येत असतात. त्यांनाही याचा मोठ्या प्रमाणत हा त्रास सहन करावा लागत आहे. गंगाखेड आगार व्यवस्थापन (Gangakhed Agar Management) मात्र याकडे जाणीवपूर्वक दुर्लक्ष करत आहे. पावसाळ्यापूर्वीची कामे आगाराने आधीच करायला हवी होती. मात्र आता पावसाळा सुरू झाल्याने पुढील काही महिने त्रास सहन करावा लागणार असल्याचे येथून प्रवास करणाऱ्या प्रवाशांनी सांगितले आहे.