‘गेली दोन वर्षे जगात कोरोनाचे सावट होते, मला आनंद आहे की आज इफ्तार पार्टी होत आहे’

मुंबई  – देशाच्या राजधानीत दिल्लीत (capital Delhi) एक प्रकारचे वेगळे वातावरण निर्माण केले जात आहे. दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल (Delhi Chief Minister Arvind Kejriwal) हे असले तरी कायदा व सुव्यवस्था (Law And Order) केंद्रसरकारकडे आहे. दिल्लीत हल्ले झाले. देशातील वातावरण बिघडवण्याचे काम झाले. आपापसातील बंधुभाव कमी करण्याचे वक्तव्य करणे योग्य नाही. वातावरण खराब करण्याचा प्रयत्न होतो आहे. राज्यातील जनता ज्याप्रकारे सर्वधर्मसमभाव मानते त्यामध्ये हिंदू असो की मुसलमान, ख्रिश्चन असो या सर्वांनी आपापसातील बंधुभाव  टिकवण्यासाठी प्रयत्न करावे असे आवाहन राष्ट्रवादी काँग्रेसचे राष्ट्रीय अध्यक्ष शरद पवार (National President of NCP Sharad Pawar) यांनी केले.

काल राष्ट्रवादी मुंबई विभागीय काँग्रेसच्यावतीने इस्लाम जिमखाना (Islam Gymkhana) येथे इफ्तार पार्टीचे (Iftar party) आयोजन करण्यात आले होते. कोणाला सभा घ्यायची तर सरकार परवानगी देणार आहे परंतु लोकांना बोलावणे आणि आपापसातील संबंध संपेल अशी वक्तव्य करणे ठीक नाही. असे काम काही राजकीय नेते करत आहे याबद्दल शरद पवार यांनी नाराजी व्यक्त केली.

मला आनंद आहे की आज इफ्तार पार्टी होत आहे. गेली दोन वर्षे जगात कोरोनाचे सावट आले होते. त्यामुळे उत्सव साजरा करायला मिळाला नाही. लग्न समारंभही साजरे करायला मिळाले नाही. आज कोरोना समस्या कमी झाली आहे. इफ्तार पार्टीच्या माध्यमातून रोजा इफ्तार स्वीकारला आहे असेही शरद पवार म्हणाले.