गंगाखेड : राम मंदिर प्राणप्रतिष्ठेनिमित्त अभाविप गंगाखेडच्या वतीने गोदावरी घाटावर स्वच्छता अभियान

गंगाखेड (विनायक आंधळे) : मर्यादा पुरुषोत्तम प्रभु श्रीरामचंद्राच्या अयोध्याधाम (Ayodhya) येथे येत्या २२ जानेवारी २०२४ रोजी विराजमान सोहळा व मंदिर उद्घाटनाचे भव्य आयोजन केले आहे. या पार्श्वभुमीवर गंगाखेड (Gangakhed) येथे आज दिनांक 21 जानेवारी 2024 रोजी भारतीय विद्यार्थी परिषद विकासार्थ विद्यार्थी (SFD) गतीविधी व गोदावरी स्वच्छता अभियान यांच्या संयुक्त विद्यमानाने गोदावरी घाट स्वच्छता अभियान (Godavari Ghat Cleanliness Mission) राबविण्यात आले. यावेळी गोदावरी घाटा वरील सर्व स्वच्छता करून लोकांना स्वच्छतेविषयी जनजागृती करण्यात आली.

शिवाजी मानकर

यावेळी उपस्थित अभियान प्रमुख ॲड.राजु देशमुख, ॲड.स्मिता देशमुख, जिल्हा संयोजक अजय टोले, शहर मंत्री अर्जुन चव्हाण, सहमंञी सुचिता नरवाडे, जिल्हा सहसंयोजक राजेश फडणीस, तालुका संयोजक संदीप पवार, ऋषिकेश गिराम, भरत गव्हाणे, अनंता निरस, गोविंद पुरी, माणिकराव मुंडे, प्रतिभाताई वाघमारे, औताडे मॅडम, चिंतामणी देवळे, दिपक जोशी समवेत अन्य कार्यकर्ते व नागरिक मोठ्या प्रमाणात उपस्थित होते.