जय हरी विठ्ठल! गौतमी पाटील पांडुरंगाच्या दर्शनाला, वारकऱ्यांची सेवा करण्याची व्यक्त केली इच्छा

पंढरपूर :- नृत्यांगणा गौतमी पाटील (Gautami Patil) ही नेहमी कोणत्या ना कोणत्या कारणामुळे चर्चेत असते. काही दिवसांपूर्वीच ती तिच्या पाटील आडनावाच्या वादामुळे चर्चेत आली होती. अशातच आता गौतमी पंढरपूरला (Gautami Patil In Pandharpur) पांडुरंगाच्या दर्शनासाठी गेली आहे. आषाढी यात्रा लवकरच सुरू होणार असून तत्पूर्वी पंढरपुरात जाऊन गौतमी विठ्ठलाच्या चरणी नतमस्तक झाली आहे.

यावेळी प्रसारमाध्यमांशी बोलताना गौतमीने सांगितले की, पंढरपूरजवळीत भागात तिचा कार्यक्रम होता. त्यामुळे ती विठुरायाच्या दर्शनासाठी गेली होती. तसेच तिने आषाढी वारीला पंढरपुरात येणाऱ्या वारकऱ्यांची सेवा करण्याचा विचार करेन असेही यावेळी म्हटले.