प्रत्येक सिनेमागृहात हनुमानासाठी एक सीट राखीव, ‘आदिपुरुष’च्या टीमच्या निर्णयाचं होतंय कौतुक

दाक्षिणात्य सुपरस्टार प्रभासचा आगामी चित्रपट आदिपुरुष (Adipurush) हा २०२३ च्या बहुप्रतिक्षित चित्रपटांपैकी एक आहे. या चित्रपटाची अनेक दिवसांपासून देशवासीय वाट पाहत आहेत. नुकताच त्याचा ट्रेलर रिलीज झाला, जो लोकांना खूप आवडला. चित्रपटाच्या प्रदर्शनाला जेमतेम दोन आठवडे शिल्लक असताना निर्मात्यांनी प्रमोशनचा शेवटचा टप्पा सुरू केला आहे.

नुकतीच आदिपुरुष टीमने रिलीज संदर्भात एक घोषणा केली. माध्यमांतील बातमींनुसार, आदिपुरुषच्या टीमने चित्रपटाच्या प्रदर्शनादरम्यान प्रत्येक चित्रपटगृहात एक जागा राखीव ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. हे न विकले गेलेले आसन लोकांच्या श्रद्धेसाठी भगवान हनुमानाला समर्पित केले जाईल.

आदिपुरुषचे दिग्दर्शन ओम राऊत यांनी केले आहे. हा चित्रपट 16 जून रोजी थिएटरमध्ये दाखल होणार आहे. हा चित्रपट तेलगू, हिंदी, तामिळ, मल्याळम आणि कन्नड या पाच भाषांमध्ये रिलीज होणार आहे. वृत्तांवर विश्वास ठेवला तर, चित्रपट प्रदर्शित होण्यापूर्वी, निर्मात्यांनी जाहीर केले आहे की प्रत्येक चित्रपटगृहात एक सीट भगवान हनुमानासाठी राखीव ठेवली जाईल. प्रत्येक स्क्रीनिंगमध्ये एक सीट विकली जाणार नाही.