कॉंग्रेसने देशात कोरोना वाढवण्याचं पाप केलं; पंतप्रधान नरेंद्र मोदींचा कॉंग्रेसवर हल्ला बोल

नवी दिल्ली : लोकसभेत सध्या अर्थसंकल्पीय संसद सुरू असून राष्ट्रपतीच्या अभिभाषणानंतर लोकसभागृहात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी भाषण केले. देशात वाढत्या कोरोना संसर्गावरून त्यावेळी त्यांनी कॉंग्रेसवर जोरदार टीका केली आहे. उत्तर प्रदेश आणि पंजाबमध्ये कॉंग्रेस मुळे कोरोनाचा विषाणूचा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढला असल्याची टीका त्यांनी केली आहे.

महाराष्ट्रातील महाविकास आघाडी सरकारवर देखील नरेंद्र मोदी यांनी कडाडून टीका केली आहे. कोरोनाच्या गंभीर काळात लॉकडाऊन सारखे निर्बंध असताना देखील कॉंग्रेसने फुकट तिकीट वाटली आणि परराज्यातील मजूरांना मुंबईमधून स्थलांतर करण्यासाठी मजबूर केलं. काही मजूरांनी पायी तर काहींना रेल्वेने प्रवास केला.

कोरोना काळात कॉंग्रेसने फक्त राजकारण केले आहे. कॉंग्रेस इतक्या वर्षात सत्तेत राहून देखील त्यांना जनता नाकारत आहे. त्यांची परिस्थिती सध्या खूप बिकट झाली आहे. या अशा घटनांवरून स्पष्ट दिसून येत आहे की, पुढील १०० वर्षात सत्तेत न येण्याचं कॉंग्रेसने स्वतः ठरवलं आहे, अशी टीका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी केली आहे.