‘Punit Balan Group’ कडून न्यू इंग्लिश स्कूलच्या विद्यार्थ्यांना ३१ संगणकांची भेट

Punit Balan Group : विद्यार्थ्यांना संगणकाविषयी गोडी वाढावी आणि या माध्यमातून विद्यार्थीदशेतच तो आधुनिक जगाशी जोडला जावा या हेतूने पुण्यातील प्रसिद्ध ‘पुनीत बालन ग्रुप’च्या (Puneet Balan Group) वतीने टिळक रोड येथील न्यू इंग्लिश स्कूल शाळेला ३१ संगणकांची भेट देण्यात आली. या डिजिटल लॅबचे उद्घाटन स्वतः युवा उद्योजक पुनीत बालन (Puneet Balan) यांच्या हस्ते करण्यात आले.

जगातील प्रत्येक क्षेत्रातील प्रत्येक कामाचा संबंध हा संगणकाशी जोडलेला असतो. केवळ लिहिण्या-वाचता येऊन आणि विविध पदव्या देणारे शिक्षण हे आता परिपूर्ण नाही तर आजच्या जगात खऱ्या अर्थाने तोच साक्षर आणि शिक्षित असतो ज्याला संगणकाचे ज्ञान असते. यादृष्टीनेच पुण्यातील न्यू इंग्लिश स्कूलला प्रसिद्ध युवा उद्योजक पुनीत बालन यांनी ३१ संगणक भेट दिले आणि संगणकाचा समावेश असलेल्या या ‘डिजिटल लॅब’चे उद्घाटनही त्यांच्या हस्ते करण्यात आले. या मदतीबाबत प्रशालेच्या मुख्याध्यापिका सुनिता राव यांनी ‘पुनीत बालन ग्रुप’चे आभार मानले आहेत. यावेळी झालेल्या कार्यक्रमाला डेक्कन एज्युकेशन सोसायटीच्या नियमक मंडळाचे अध्यक्ष प्रमोद रावत हेही उपस्थित होते.

यावेळी बोलतान पुनीत बालन म्हणाले, ‘‘माझ्या आईनेही शिक्षिका म्हणून काम केलं. त्यांच्याकडूनच मला सामाजिक कामे करण्याची प्रेरणा मिळाली. म्हणूनच विद्यार्थ्यांचे प्रश्न सोडवताना मला नेहमीच आनंद होतो. या लॅबमुळे विद्यार्थ्यांना अद्ययावत शिक्षण घेण्यास मोठी मदत होणार आहे. शिक्षकांनी आणि त्यांच्या पालकांनीही मुलांना त्यांच्या आवडीच्या क्षेत्रात शिकण्यास आणि काम करण्यास प्रोत्साहन दिले पाहिजे. यामुळे आवडीप्रमाणे शिक्षण आणि काम मिळाल्यामुळे भावी पिढी घडण्यास मोठी मदत होणार आहे.’’

‘पुनीत बालन ग्रुप’ने नेहमीच सामाजिक दायित्वाची भूमिका सक्षमपणे निभावली आहे. गुणी आणि होतकरु खेळाडूंना आर्थिक मदत करून त्यांच्या गुणवत्तेला वाव देणे, राज्यातही आणि जम्मू-काश्मिरसारख्या दहशतग्रस्त भागातही शाळा चालवणे असे अनेक उपक्रम त्यांनी यापूर्वी राबवले आहेत. शिवाय पुण्यातील प्रसिद्ध शिवाजी मराठा सोसायटीच्या वसतिगृहासाठीही त्यांनी भरीव आर्थिक मदत केली आहे. त्यांच्या या सामाजिक उपक्रमाचे नेहमीच कौतुक केले जाते.

कोट
‘‘शिक्षण हा विकासाचा पाया असतो. म्हणून समाजाच्या सर्व स्तरातील मुलांना चांगले शिक्षण मिळाले पाहिजे. तरच जागतिक स्पर्धेत आपण टिकाव धरू शकू. त्यासाठी शक्य तेथे शक्य ते सहकार्य करण्याचा ‘पुनीत बालन ग्रुप’चा नेहमीच प्रयत्न राहीलाय. याच भावनेतून न्यू इंग्लिश स्कूला संगणक देण्यात आले. याचा अधिकाधिक विद्यार्थी उपयोग करुन प्रगतीच्या दिशेने पाऊलं टाकतील, असा विश्वास आहे.’’

महत्वाच्या बातम्या : 

Vijay Vadettiwar | सरकारी तिजोरी स्वच्छ करण्याच्या मंत्र्यांमधील स्पर्धेला आता ऊत आलाय

Maharashtra Politics | पक्ष चोराचोरीत दंग असलेल्या महायुती सरकारला शेतकऱ्यांचा विसर

Maharashtra Kranti Sena | महायुतीची ताकत वाढली; आणखी एका पक्षाची मिळणार साथ