गौतमीने पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी; २० वर्षांपासून दूर राहात असलेल्या लेकीच्या आठवणीत बाप झाला भावूक

सध्या महाराष्ट्रात सर्वाधिक चर्चेत असलेले नाव म्हणजे गौतमी पाटील (Gautami Patil). गौतमीच्या अदांवर अवघा महाराष्ट्र तर फिदा झालायच. पण जसजशी गौतमीची प्रसिद्धी वाढत आहे, तसतशी तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल अधिक जाणून घेण्याची उत्सुकता तिच्या चाहत्यांना लागली आहे. गौतमी सध्या तिच्या आईसोबत राहाते आणि बऱ्याचदा मुलाखतीत ती तिच्या आईचा उल्लेखही करते. परंतु तिचे वडील कोण आहेत, ते कुठे राहतात काय करतात गौतमी त्यांना का बोलत नाही, असे प्रश्न तिच्या चाहत्यांना पडले आहेत.

आता स्वत: गौतमीच्या वडिलांनी (Gautami Patil Father) या सर्व प्रश्नांची उत्तरे दिली आहेत. तसेच आपल्याला आपल्या लेकीची खूप आठवण येते, असे म्हणत ते भावूकही झाले.

आपली लेक गौतमी ही संपूर्ण देशात प्रसिद्ध झाली आहे. त्याचा अभिमान पण वाटतो. मात्र काही गोष्टींमुळे तिच्यावर टीका होते तेव्हा दुःख होतं, असं रवींद्र पाटील म्हणाले. आपल्या व्यसनामुळे किंवा कौटुंबीक वादामुळे मुलगी गौतमी ही आणि तिची आई हे दोघे सोबत नसल्याचं मोठं दुःखही रवींद्र पाटील यांना आहे. गौतमीची खूप आठवण येते. ती व तिच्या आईने पुन्हा आपल्या सोबत राहावं हे सांगताना रवींद्र पाटील यांना अश्रू अनावर झाले.

आपण गौतमीच्या कायम पाठीशी असल्याचं म्हटलं आहे. एकदा तरी गौतमीने भेटण्यासाठी यावं आपल्याला पुन्हा पप्पा म्हणून हाक मारावी, अशी अपेक्षाही तिचे वडील रवींद्र पाटील यांनी व्यक्त केली.

कोण आहेत गौतमीचे वडील?
गौतमी पाटीलच्या वडिलांचे नाव रवींद्र बाबुराव पाटील (नेरपगारे) असे असून ते सध्या जळगाव जिल्ह्यातील चोपडा तालुक्यातील वेळोदे या गावी राहतात. हेच गौतमीचे मूळ गाव आहे. तिच्या वडिलांच्या माहितीनुसार, जन्मानंतर काही दिवस गौतमी सुद्धा कुटुंबासह इथेच राहात होती पण नंतर ती मामाच्या गावाला म्हणजेच धुळे जिल्ह्यातील शिंदखेडा इथे आईबरोबर राहायला गेली. तर गौतमीने यापूर्वी एका मुलाखतीत सांगितल्याप्रमाणे गौतमीच्या जन्माचं आधीच आई व वडील वेगळे झाले होते, आठवीत असताना गौतमीने पहिल्यांदा वडिलांना पहिले होते.

गौतमीने केलेल्या आरोपानुसार, तिचे वडील म्हणजे रवींद्र पाटील यांना दारूचं व्यसन होतं. त्यामुळे पत्नीशी वाद व्हायचे यावेळी त्यांच्याकडून मारहाण झाल्याचे सुद्धा गौतमीने स्वतः सांगितले आहे. मीडिया रिपोर्टनुसार, गौतमीचे आई वडील विभक्त झाल्यावर वडिलांनी पुण्यात एकाठिकाणी सुरक्षा रक्षक म्हणून नोकरी केली होती. यादरम्यान रवींद्र पाटील यांच्या पालकांचे निधन झाले व त्यावेळी गौतमी व तिची आई अंत्यसंस्कारांना आली नाही. या रागातून मागील साधारण २० वर्षे गौतमीची आई व वडील विभक्तच राहिले आहेत. सध्या गौतमीच्या वडिलांकडे त्यांच्या मूळ गावी घर व काही शेती आहे. याच शेतीतून ते आपला उदरनिर्वाह करतात.