वडिलांना हार्ट अटॅक आल्याचे सांगत प्रेयसीने घरी बोलवले अन् प्रियकराचे गुप्तांग कापले, वाचा घटनाक्रम

Crime News: बिहारमधील (Bihar) मुझफ्फरपूरमध्ये एका तरुणाचे गुप्तांग कापून फसवणूक केल्याची घटना समोर आली आहे. वडिलांना हृदयविकाराचा झटका (Heart Attack) आल्याच्या बहाण्याने त्याच्या प्रेयसीने त्याला घरी बोलावले आणि नंतर कटाचा भाग म्हणून कुटुंबीयांनी तरुणाला आयुष्यभराची जखम दिली. जखमी तरुण कसा तरी घटनास्थळावरून पळून जाण्यात यशस्वी झाला. सध्या पीडित तरुणावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

पीडित मुलाच्या वडिलांनी तक्रारीत म्हटले आहे की, त्यांचा मुलगा आणि आरोपीच्या मुलीचे अनेक दिवसांपासून प्रेमसंबंध होते. यामुळे संतापलेल्या मुलीच्या कुटुंबीयांनी फोन लावून पहाटे साडेचार वाजता मुलाला घरी बोलावले. मुलाला तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आल्याचे सांगण्यात आले. त्यांना डॉक्टरांकडे न्यावे लागेल. लवकर घरी ये, असे म्हणण्यात आले. यानंतर घरातून जिमला जाण्याऐवजी मुलगा मुलीच्या घरी पोहोचला. मात्र मुलीच्या भावाने त्याला मारहाण करून त्याचे गुप्तांग धारदार शस्त्राने कापले. घटनास्थळी मुलीचे आई आणि वडीलही उपस्थित होते.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, हा तरुण सकाळी प्रमाणेच जिमला जाण्यासाठी घरातून निघाला होता. त्यानंतर मुलीने त्याला फोन केला की तिच्या वडिलांना हृदयविकाराचा झटका आला आहे. डॉक्टरांकडे न्यावे लागेल. लवकर या. मुलगा मुलीच्या घरी पोहोचताच मुलीच्या भावाने त्याला आत ओढले. प्रथम त्याला बेदम मारहाण केली. त्यानंतर त्याची सोन्याची साखळी, अंगठी व मोबाईल हिसकावून नेला. नंतर त्याचे गुप्तांग कापण्यात आले. जखमी मुलाने कसा तरी जीव वाचवण्यासाठी तेथून पळ काढला.

सध्या तरुणावर बैरिया येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार प्रकृती चिंताजनक आहे. त्याचवेळी तरुणाच्या वडिलांनी याप्रकरणी मुलीची आई आणि भावाविरुद्ध शहर पोलीस ठाण्यात सरैय्यागंज गोला रोड येथे फिर्याद दिली आहे. पोलिसांनी या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.

महत्वाच्या बातम्या-

…तर मनोज जरांगेंपेक्षा मोठं आंदोलन उभं करू; ओबीसी महासंघाचा इशारा

मी अजितदादांना विनंती करतो छगन भुजबळांना जरा समज द्या,नाहीतर ते – जरांगे पाटील

मराठ्यांच्या ढाण्या वाघाची डरकाळी; मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा