मी अजितदादांना विनंती करतो छगन भुजबळांना जरा समज द्या,नाहीतर ते – जरांगे पाटील 

Manoj Jarange Patil: अंतरवली सराटी येथे भगवे वादळ पाहायला मिळाले. हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीत एकत्र जमले होते. यावेळी बोलताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी दिले आहेत. तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 40 व्या दिवशी काय करणार हे सांगू, असा सूचक इशाराच मनोज जरांगे पाटील यांनी दिला.

यावेळी त्यांनी भरसभेत सरकारकडे सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. दरम्यान, जरांगे यांनी आज मंत्री छगन भुजबळ यांना चांगलेच फैलावर घेतले. मनोज जरांगे पाटील यांनी छगन भुजबळ यांच्यावर थेट निशाणा साधला आहे. मी अजितदादांना विनंती करतो. छगन भुजबळांना जरा समज द्या. नाहीतर ते माझ्या नादी लागले तर काही खरं नाही. मग मी सोडत नाही, असं मनोज जरांगे पाटील यांनी म्हटलं आहे.

मनोज जरांच्या यांच्या प्रमुख मागण्या
मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा
कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी
मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी
दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या
PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे

महत्वाच्या बातम्या –