तिकडे पाकिस्तान ऑलआऊट अन् इकडे प्रेक्षक क्लीन बोल्ड, उर्वशीच्या रुपात स्टेडियममध्ये निळं वादळ

IND vs PAK World Cup: अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर (Narendra Modi Stadium) १ लाख ३० हजार लोकांपुढे पुन्हा एकदा भारतीय संघाने पारंपारिक प्रतिस्पर्धी पाकिस्तानला वनडे विश्वचषकाच्या थरारक सामन्यात पराभूत केले. भारताचा कर्णधार रोहित शर्मा हा विजयाचा खरा अर्थाने शिल्पकार राहिला. नाणेफेकीनंतर गोलंदाजीचा चपळ निर्णय घेण्यापासून ते धुव्वादार फलंदाजीपर्यंत त्याने संघाच्या विजयात मोलाचा वाटा उचलला. भारताने ७ विकेट्स राखून हा सामना खिशात घातला. तसेच स्पर्धेतील विजयाची हॅट्रिकही पूर्ण केली.

मात्र या सामन्यात लाखोंच्या प्रेक्षकांत एका चेहऱ्याने सर्वांचे लक्ष वेधले. तो चेहरा होता बॉलीवूड अभिनेत्री उर्वशी रौतेला (Urvashi Rautela) हिचा. उर्वशीचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल झालाय.

यात पाहायला मिळतं की, उर्वशी अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भारत – पाकिस्तान सामन्यासाठी उपस्थित होती. १ लाखाहून अधिक प्रेक्षकांनी खचाखच भरलेल्या या स्टेडियममध्ये उर्वशी भारत आणि पाकिस्तान यांच्यातील क्रिकेट सामन्याचा आनंद घेताना दिसत आहे. यावेळी, उर्वशी रौतेलाने स्टायलिश निळ्या रंगाचा ड्रेस परिधान केला आहे. टीम इंडियाला सपोर्ट करण्यासाठी उर्वशीने हा खास ड्रेस परिधान केलाय असं बोललं जातंय.