मराठ्यांच्या ढाण्या वाघाची डरकाळी; मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला दिला ‘हा’ इशारा 

मनोज जरांच्या यांच्या काय आहेत प्रमुख मागण्या ?

Manoj Jarange Patil : अंतरवली सराटी येथे भगवे वादळ पाहायला मिळाले. हजारो मराठा बांधव अंतरवली सराटीत एकत्र जमले होते. यावेळी बोलताना मराठा समाजाचे नेते मनोज जरांगे पाटील यांनी सरकारला आणखी दहा दिवस आरक्षणाचा निर्णय घेण्यासाठी दिले आहेत. तुम्ही आरक्षणाचा निर्णय घेतला नाही तर 40 व्या दिवशी काय करणार हे सांगू, असा सूचक इशाराच मनोज जरांगे पाटील (Manoj Jarange Patil) यांनी दिला.केंद्र आणि राज्य सरकारने मराठ्यांचे हाल करू नये. तुम्ही आमचा ओबीसीत समावेश करा. दहा दिवसापेक्षा अधिक काळ वाट पाहण्याची आमची तयारी नाही, असा इशाराच त्यांनी दिला आहे.

यावेळी त्यांनी भरसभेत सरकारकडे सहा महत्त्वाच्या मागण्या मांडल्या आहेत. मराठा समाजाला सरसकट कुणबी असल्याचं प्रमाणपत्र द्या आणि मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणी मनोज जरांगे पाटील यांनी केली आहे. आम्हाला महाराष्ट्रातील मराठा समाजाला 50 टक्क्याच्या आत मराठा म्हणून वेगळा प्रवर्ग करून आरक्षण दिलं तरी चालेल. पण एनटी व्हिजेएनटीचा प्रवर्ग टिकला तरच आरक्षण घेणार. नाही तर 50 टक्क्याच्यावर घेणार नाही, असंही जरांगे पाटील यांनी सांगितलं.

मराठा आरक्षणासाठीची स्थापन करण्यात आलेल्या समितीचं काम बंद करा. चार दिवसात कायदा पारित होणार नाही. एक महिन्याचा काळ द्या असं तुमचं आमचं ठरलं होतं. आता 5 हजार पानांचा पुरावा मिळाला आहे. त्याचा आधार घेऊन कुणबी समाजात समावेश करून मराठा समाजाचा ओबीसीत समावेश करा, अशी मागणीही त्यांनी केली.

मनोज जरांच्या यांच्या प्रमुख मागण्या
मराठ्यांचा ओबीसीमध्ये समावेश करावा
कोपर्डी बलात्कारातील आरोपींना फाशी द्यावी
मराठा आरक्षणात बलिदान दिलेल्या 45 बांधवांना सांगितलेला निधी आणि सरकारी नोकरी द्यावी
दर दहा वर्षाने आरक्षण दिलेल्या ओबीसी बांधवांचा सर्व्हे करावा. सर्व्हे करुन प्रगत जाती बाहेर काढण्यात याव्या
PHD करणाऱ्या विद्यार्थ्यांना जास्तीचा निधी देऊन , त्यांचे प्रश्न तातडीने मार्गी लावावे

महत्वाच्या बातम्या –

महिलांनो रस्त्यावर उतरा,सरकार केसेस टाकेल, पण तरीही घाबरु नका ; शरद पवारांचा सल्ला

उबाठा गटाने दादाजी भुसे यांच्यावर केलेले आरोप म्हणजे ‘अंधारा’त तीर मारण्याचा प्रयत्न – शीतल म्हात्रे

महाराष्ट्रातून १०० टक्के पंतप्रधान मोदींनाच समर्थन! चंद्रशेखर बावनकुळे यांचा दावा

मराठा समाजाला आरक्षण मिळवून देण्याची आशा पुन्हा पल्लवित; सर्वोच्च न्यायालयत पहा काय घडलं