उद्धवजींची मुलाखत घ्यायची एक संधी मलाही दया; मनसेच्या नेत्याचे थेट आव्हान

मुंबई – शिवसेना खासदार आणि दैनिक ‘सामना’चे (Saamana) कार्यकारी संपादक संजय राऊत (Sanjay Raut) यांनी पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) यांची मुलाखत घेतली आहे. संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंच्या मुलाखतीचा एक फोटो ट्विट करुन याची माहिती दिली होती. आता मुलाखतीचा टिझर प्रदर्शित करुन उद्धव ठाकरे यांच्या ‘जोरदार’ मुलाखतीची उत्कंठा शिगेला पोहोचली आहे.संजय राऊत यांनी ट्विट केलेल्या टिझरमध्ये उद्धव ठाकरे सध्याच्या राजकीय घडामोडींवरील प्रश्नांना थेटपणे उत्तरं देताना दिसत आहेत. मुख्यमंत्रीपदावरुन पायउतार व्हावं लागलं आणि पक्षात फूट पडली यात नेमकं काय चुकलं? महाविकास आघाडीचा (MVA) प्रयोग चुकला का? असा प्रश्न संजय राऊत यांनी उद्धव ठाकरेंना विचारल्याचं टिझरमध्ये दिसून येत आहे.

दरम्यान, आता मनसेचे नेते योगेश चिले यांनी एक ट्वीट केले असून एक मोठी मागणी करत आव्हान दिले आहे.  मा. उद्धवजींची मुलाखत घ्यायची एक संधी मलाही दया… मग कळेल सामना कसा रंगतो ते… असं चिले यांनी म्हटले आहे. आता उद्धव ठाकरे ही मागणी पूर्ण करतात का हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.