Govt Scheme : केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना नेमकी काय आहे? याचा लाभ कुणाला घेता येतो ?

पुणे – केंद्रवर्ती अर्थसंकल्प योजना आदिवासी विकास विभागाच्या (Tribal Development Department) माध्यमातून राबविण्यात येणारी महत्वपूर्ण योजना आहे. योजनेचा लाभ हा अनुसूचित जमातीच्या बांधवांना देण्यात येतो. स्थानिक आदिवासींच्या गरजा लक्षात घेत आदिवासी बांधवांना मुख्य प्रवाहात आणण्यासाठी योजनेचा प्रत्यक्ष लाभ मिळवून देणे हा योजनेचा उद्देश आहे.

गट अ- उत्पन्न निर्मिती व वाढीच्या योजना. (या गटात आदिवासी लाभार्थ्याला ८५ टक्के तर आदिम जमातीच्या लाभार्थ्यांना १०० टक्के अनुदान आहे)
गट ब- प्रशिक्षणाच्या योजना तसेच कौशल्य विकास कार्यक्रम (यामध्ये संभाव्य नोकरी व्यवसायासाठी प्रशिक्षणाच्या योजनेचा समावेश आहे.)
गट क- मानव साधन संपत्ती विकासाच्या व आदिवासी कल्याणात्मक योजना.

योजनेची अंमलबजावणी

■ प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव ता.आंबेगाव जि.पुणे यांच्यामार्फत पुणे, सातारा, सांगली व कोल्हापुर या चार जिल्ह्यात राबविण्यात येते.

■ या योजनांमध्ये प्रती लाभार्थी कुटुंब मर्यादा ५० हजार रुपयापर्यंत आर्थिक मदत देण्यात येते. या योजनेसाठी लाभार्थ्यांना व बचतगटांना डीबीटी प्रणाली मार्फत बँक खात्यावर निधी अदा करण्यात येतो.

अधिक माहितीसाठी संपर्क : प्रकल्प अधिकारी, एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प घोडेगाव (जुन्नरफाटा) नविन प्रशासकीय इमारत, ता.आंबेगाव जि.पुणे.