मित्रांनी लग्नात तलवारी नाचवल्या, पोलिसांच्या भीतीने नवरदेव बुडाला पाय लावून पळाला…

लातूर : आधी टिक-टॉक आलं मग इंस्टाग्राम रिल्स… आणि असे असंख्य शॉर्ट व्हिडीओ ऍप्स. यातून अल्पवधीत सोशल मीडिया हिरो होण्याच्या अनेक संधी घरबसल्या चालून आल्या. मग सुरु झाली स्वतःला ‘भाई’ दाखवून देण्याची चढाओढ. कोणी शिव्यांची लाखोली वाहायला लागलं तर कोणी नंग्या तलवारी नाचवायला लागलं. पण असं करणं आता चांगलंच अंगलट येताना दिसत आहे. नुकतेच अशाच कॅटेगिरी मधील स्वयंघोषित ‘थेरगाव क्वीन’ला पोलिसांनी चांगलाच इंगा दाखवलाय. आता अशा मूर्खपणाची किंमत नवरदेवालाच चुकवावी लागलीय.

बातमी आहे लातूर मधील, लातूर शहरातील एलआयसी कॉलनी भागात शुभम तुमकुटे या तरुणाचा लग्नसमारंभ होता. हळदीच्या कार्यक्रमात त्याचे काही मित्र सहभागी झाले होते. मग काय फुल्ल झिंगाट झालेल्या नवरदेवाच्या मित्रांनी गाण्यांच्या तालावर ठेका धरला. आणि हिरो होण्याच्या नादात यावेळी काही तरुणांनी हातात तलवार आणि कोयते घेऊन नंगा नाच केला.

पण याची किंमत थेट नवरदेवालाच चुकवावी लागलीय. मित्रांच्या या कृत्यामुळे आता नवरदेव चांगलाच अडचणीत सापडला आहे. सार्वजनिक ठिकाणी जवळपास दीड तास हा नंगा नाच सुरु होता. याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायर झाला आणि याची माहिती विवेकानंद पोलिसांना मिळाली.

मग काय पोलीस येतील आणि कारवाई होईल या भीतीने नवरदेवाच्या धारेवर पाचर बसली आणि पोलीस कारवाईच्या भीतीने नवरदेव बुडाला पाय लावून पळाला. आता फरार झाला असून पोलीस त्याचा शोध घेत आहेत. तर पोलिसांनी नवरदेवाच्या मित्रांना ताब्यात घेतलं आहे.