वर्ल्डकपनंतर BCCI चा मोठा निर्णय, राहुल द्रविड यांना मुख्य प्रशिक्षकपदी केले कायम

Indian Cricket Team Head Coach: भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) राहुल द्रविडची (Rahul Dravid) पुन्हा एकदा टीम इंडियाच्या प्रशिक्षकपदी नियुक्ती केली आहे. 2023 च्या एकदिवसीय विश्वचषक स्पर्धेनंतर त्याचा करार संपला होता. आता बीसीसीआयने त्याचा करार वाढवला आहे. वरिष्ठ पुरुष संघाचे मुख्य प्रशिक्षक राहुल द्रविड यांच्यासह क्रीडा कर्मचाऱ्यांचा करारही वाढवण्यात आला आहे. बीसीसीआयने मुख्य प्रशिक्षक आणि सपोर्ट स्टाफचा कार्यकाळ किती दिवसांसाठी वाढवला याची माहिती दिलेली नाही.

BCCI च्या प्रेस रिलीझमध्ये म्हटले आहे की, नुकत्याच संपलेल्या एकदिवसीय विश्वचषक 2023 नंतरचा करार संपल्यानंतर बीसीसीआयने राहुल द्रविड यांच्याशी अर्थपूर्ण चर्चा केली आणि सर्वांच्या संमतीने करार वाढवण्याचा निर्णय घेण्यात आला.

राहुल द्रविड यांनी गेली 20 वर्ष भारतीय क्रिकेट संघासोबत एक खेळाडू, कर्णधार आणि प्रशिक्षक म्हणून प्रवास केला. राहुल द्रविडच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2022 टी 20 विश्वचषकाची उपांत्य फेरी गाठली होती. त्याशिवाय 2021-23 चॅम्पियन्स ट्रॉफीची फायनलही गाठली. तसेच 2023 विश्वचषक फायनलही गाठली होती. फायनलमध्ये ऑस्ट्रेलियाकडून पराभवाचा सामना करावा लागला. भारतीय संघाने लागोपाठ 10 सामन्यात विजय मिळवला होता.

महत्वाच्या बातम्या-