ऑक्टोबरच्या तुलनेत नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन घटले, 1,45,867 कोटी रुपयांची जीएसटी वसुली

Mumbai – नोव्हेंबर 2022 साठी GST संकलनाचे आकडे समोर आले आहेत. नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 1,45,867 कोटी रुपये आहे. ऑक्टोबरमधील १,५१,७१८ कोटींच्या आकड्यापेक्षा हा आकडा कमी असला तरी नोव्हेंबर 2021 मधील जीएसटीच्या वसुलीच्या तुलनेत या वर्षी नोव्हेंबरमध्ये जीएसटी संकलन 11 टक्क्यांनी वाढले आहे. हा सलग नववा महिना आहे जेव्हा GST संकलन 1.40 लाख कोटींहून अधिक झाले आहे.

वित्त मंत्रालयाने जारी केलेल्या GST संकलनाच्या आकडेवारीनुसार, नोव्हेंबरमध्ये CGST संकलन 25,681 कोटी रुपये आणि SGST संकलन 32,651 कोटी रुपये होते. या कालावधीत 77,103 कोटी रुपयांचे IGST संकलन आणि उपकराद्वारे 10,433 कोटी रुपये वसूल झाले आहेत. नोव्हेंबर 2021 च्या तुलनेत नोव्हेंबर 2022 मध्ये GST संकलन 11 टक्क्यांनी वाढले आहे. गेल्या वर्षी याच महिन्यात १,३१,५२६ कोटी रुपयांचे जीएसटी संकलन झाले होते.