IPL 2024 | दिल्ली कॅपिटल्सची ताकद वाढली, ऋषभ पंत तिहेरी ताकदीसह उतरणार मैदानात

22 मार्चपासून आयपीएल 2024 (IPL 2024) चा हंगाम सुरू होत आहे……. दिल्ली कॅपिटल्सने मजबूत संघासह मैदानात उतरण्याची योजना आखली आहे. दिल्लीच्या बाजूने सर्वात चांगली गोष्ट म्हणजे ऋषभ पंतचे पुनरागमन झाले. तेही कर्णधारपद, फलंदाजी आणि यष्टिरक्षण या तिहेरी ताकदीने. कर्णधारपदाच्या आघाडीवर, पंत आयपीएल 2024 मध्ये डेव्हिड वॉर्नरची जागा घेईल, ज्याने गेल्या हंगामात दिल्ली कॅपिटल्सची नेतृत्त्वाची जबाबदारी स्वीकारली होती.

आयपीएल 2024 मध्ये दिल्ली कॅपिटल्स 22 मार्चपासून पंजाब किंग्ज विरुद्ध 23 मार्चपासून आपल्या मोहिमेची सुरुवात करेल. आयपीएलचा शेवटचा हंगाम दिल्लीसाठी चांगला नव्हता. 10 संघांच्या स्पर्धेत हा संघ 9व्या क्रमांकावर होता. पण, यावेळी त्यांना आपल्या कामगिरीत सुधारणा करायची आहे आणि असा खेळ दाखवून जेतेपदापर्यंत जाता यावे, या उद्देशाने त्याला मैदानात यायचे आहे.

आयपीएल 2024 च्या लिलावानंतर DC मजबूत झाला
आयपीएल 2024 च्या (IPL 2024) लिलावानंतर सर्व संघांमध्ये बदल करण्यात आले आहेत. दिल्ली कॅपिटल्समध्येही हा बदल दिसून आला आहे. लिलावानंतर शे होप, ट्रिस्टन स्टब्स, जे रिचर्डसन यांसारखे खेळाडू आल्याने संघाची फलंदाजी आणि गोलंदाजी दोन्हीची ताकद वाढली आहे. त्यातच ऋषभ पंतचे कर्णधारपदी पुनरागमन झाले आहे. त्यामुळे एकूणच, दिल्ली कॅपिटल्सच्या सांघिक संयोजनाच्या दृष्टिकोनातून गोष्टी चांगल्या झाल्या आहेत.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Ashish Shelar | भाजपा स्थापना दिनानिमित्त मुंबईत चारशे कार्यक्रमांचे आयोजन, ॲड. आशिष शेलार यांची माहिती

Prakash Ambedkar | आमचा शिवसेना आणि राष्ट्रवादी काँग्रेसवरुन विश्वास उडाला, प्रकाश आंबेडकरांचे थेट काँग्रेस अध्यक्षांना पत्र

Praniti Shinde | जो पक्ष मतांचं विभाजन करतो, तो भाजपाला मदत करतो; प्रणिती शिंदे यांच्याकडून वंचितची अप्रत्यक्ष धुलाई