एमआयएमवाले काय तुमचे जावाई आहेत का? मेहबूब शेख यांचा सवाल 

Mahebub Shaikh : राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष मेहबूब शेख (Mahebub Shaikh) यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि भाजपवर जोरदार हल्लाबोल केला आहे. एमआयएमवाले काय तुमचे जावाई आहेत का? असा तिखट प्रश्न त्यांनी केला आहे.

एबीपीने दिलेल्या वृत्तानुसार, शेख म्हणाले,  अमित शहा आपल्या भाषणात सांगतात, मी नवाब मलिक यांना जेलमध्ये घातलं. मी युपीच्या आजम खानला जेलमध्ये टाकलं. त्यामुळे अमित शहा यांना माझा प्रश्न आहे की, तुम्ही नवाब मलिक यांना मुस्लीम आहे म्हणून जलेमध्ये टाकलं म्हणतात, आजम खान यांना मुस्लीम आहे म्हणून जेलमध्ये टाकलं म्हणतात, मग एमआयएमवाले काय तुमचे जावाई आहेत का? असा टोला मेहबूब शेख यांनी लगावला.