शरद पवार यांच्या पॅनलला धक्का, गुणरत्न सदावर्ते यांची निवडणुकीत जोरदार बाजी

Mumbai – स्टेट ट्रान्सपोर्ट को-ऑप बॅंकेच्या (State Transport Co Operative Bank) निवडणुकीत गुणरत्न सदावर्ते यांच्या एसटी कष्टकरी जनसंघाच्या पॅनलने एकतर्फी विजय मिळवला आहे. सदावर्ते यांच्या पॅनलने सर्वच्या सर्व 19 जागांवर विजय मिळवला आहे. त्यामुळे पुन्हा एकदा एसटी आंदोलनानंतरही एसटी कर्मचाऱ्यांवर सदावर्तेंची जादू कायम असल्याचं दिसतंय. संदीप शिंदे यांच्या एसटी कामगार संघटनेच्या पॅनलचा सदावर्ते यांच्या पॅनलने दारुण पराभव केलाय.

गेल्या 15 वर्षांपासून या बँकेवर स्टेट कर्मचारी संघटनेचे वर्चस्व होते. स्टेट कर्मचारी संघटना ही राष्ट्रवादी काँग्रसचे अध्यक्ष शरद पवार यांची पुरस्कृत मानली जाते. एसटी विलीनीकरण आंदोलनातून एन्ट्री करणाऱ्या गुणरत्न सदावर्तेंनी आता स्टेट ट्रान्सपोर्ट को. ऑपरेटीव्ह बँकेवर वर्चस्व प्रस्थापित केलंय.