बेळगावमध्ये उद्यापासून रंगणार राष्ट्रीय रोलबॉल स्पर्धा, महाराष्ट्राच्या दोन्ही संघाची घोषणा

पुणे : भारतीय रोल बॉल महासंघ व कर्नाटक रोल बॉल संघटना यांच्या संयुक्त विद्यमाने २० व्या वरिष्ठ राष्ट्रीय रोल बॉल स्पर्धेचे आयोजन, बेळगाव, कर्नाटक येथे दिनांक ४ जानेवारी ते ७ जानेवारी या कालावधीत करण्यात आले आहे. या स्पर्धे करिता २३ पुरुष संघ – उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, केरला, रोलर स्पोर्ट्स आणि सोशल अकॅडमी, दिल्ली, आसाम, गोवा, छत्तीसगड, चंडीगड, पंजाब, कर्नाटका, पोंडीचेरी, तेलंगाना, मध्य प्रदेश, वेस्ट बंगाल, हरयाणा, तामिळनाडू, दिव आणि दमन, आंध्रप्रदेश आणि १५ महिला संघ – उत्तर प्रदेश, महाराष्ट्र, झारखंड, गुजरात, राजस्थान, जम्मू आणि काश्मीर, केरला, आसाम, छत्तीसगड, कर्नाटका, पोंडीचेरी, मध्य प्रदेश, वेस्ट बंगाल, हरयाणा, तामिळनाडू इत्यादी संघ सहभागी झाले आहेत.

या स्पर्धेसाठी महाराष्ट्र रोल बॉल संघातील खेळाडूंना महाराष्ट्र रोल बॉल संघटनेचे संघटनेचे अध्यक्ष श्री संदीप खर्डेकर व कोथरूड महिला आघाडी अध्यक्ष सौ. अस्मिता करंदीकर, प्रकाशतात्या बालवडकर, लहुजी बालवडकर, सचिव प्रताप पगार यांच्या हस्ते प्लेईग कीटचे वाटप करण्यात आले.

१९वी राष्ट्रीय स्पर्धा मागील वर्षी स्पर्धा जम्मू आणि काश्मीर येथे घेण्यात आली होती. या स्पर्ध्येमध्ये पुरुष गटात उत्तर प्रदेश संघाने विजेतेपद मिळाले होते तर महाराष्ट्र संघाला उपविजेतेपद मिळाले होते.महिला गटात विजेता संघ राजस्थान ठरला होता तर उत्तर प्रदेश द्वितीय क्रमांकावर होता.

महाराष्ट्राचा पुरुष संघ – निलेश शिंदे संघ नायक अहमदनगर, अमितेश बोदडे – यवतमाळ, रचित वर्मा – ठाणे, राहुल पाटील – नंदुरबार, आदित्य मगदूम- कोल्हापूर, सिद्धार्थ सोनार – कोल्हापूर, सिद्धार्थ बोंबले, रोहन दाभाडे, प्रठीक साठे, मनीष राठोर, मधुसुधन रत्नपारखी, साहिल खेडेकर (सर्व पुणे) मार्गदर्शक प्रभाकर वडवेराव -पुणे, व्यवस्थापक राजेश चौगुले- कोल्हापूर.

महिला संघ – श्वेता कदम संघ नायक, रेवती हिंगे, वैष्णवी कुलकर्णी, सुहानी सिंग, सई शिंद्रे, सेजल तोटे, सानिया शेळके, वैभवी कदम (सर्व पुणे) मार्गदर्शक प्रियांक पोळ, व्यवस्थापक शुभांगी कांबळे दोघीही कोल्हापूर.

महत्वाच्या बातम्या-

‘त्यांच्या विचारांमध्ये रामापेक्षा रावण प्रकर्षानं..’, रामाला मांसाहारी म्हणणाऱ्या आव्हाडांवर भाजपाची टीका

‘राम बहुजनांचे, ते मांसाहारी अन्न खात असत’, जितेंद्र आव्हाड यांचे विधान

अभिषेक बच्चनसोबत घटस्फोटाच्या चर्चेदरम्यान ऐश्वर्या राय पोहोचली बागेश्वर बाबांच्या दरबारात