‘खराब अंपायरिंग आणि बेकार नियम…’, पाकिस्तानच्या पराभवानंतर हरभजनने आयसीसीला धरले धारेवर

Harbhajan Singh Criticize ICC: शुक्रवारी (२७ ऑक्टोबर) विश्वचषक २०२३ मध्ये (World Cup 2023) पाकिस्तानचा शेवटच्या क्षणी पराभव झाल्यानंतर भारताचा माजी गोलंदाज हरभजन सिंगने आयसीसीवर निशाणा साधला आहे. खराब अंपायरिंग आणि आयसीसीच्या चुकीच्या नियमांमुळे पाकिस्तानचा पराभव झाल्याचे त्याने म्हटले आहे. त्याने आयसीसीकडे नियम बदलण्याची मागणीही केली आहे.

हरिस रौफच्या (Haris Rauf) ज्या चेंडूवर पाकिस्तानचा विजय निश्चित झाला, त्या चेंडूबाबत हरभजनने हा प्रश्न उपस्थित केला आहे. खरे तर, दक्षिण आफ्रिकेच्या डावातील ४६व्या षटकातील शेवटच्या चेंडूवर तबरेझ शम्सीला पायचित घोषित करण्याचे खूप आवाहन करण्यात आले होते. अंपायरने शम्सीला आऊट न दिल्याने कर्णधार बाबरने (Babar Azam) रिव्ह्यू घेतला. रिव्ह्यूमध्ये चेंडू लेगस्टंपला थोडासा आदळताना दिसला. म्हणजे इथे अंपायर कॉल दिला होता. आता मैदानी पंचाचा निर्णय नॉट आउट असल्याने दक्षिण आफ्रिकेला जीवदान मिळाले.

जर ही विकेट मिळाली असती तर सामना इथेच संपला असता आणि पाकिस्तान संघाने ७ धावांनी सामना जिंकला असता. कारण यावेळी दक्षिण आफ्रिकेने २६३ धावांवर ९ विकेट्स गमावल्या होत्या. या चुकीनंतर दक्षिण आफ्रिकेने पुढच्या ८ चेंडूत विजय मिळवला. यावरच हरभजनने प्रश्न उपस्थित केला आहे.

हरभजनने काय लिहिले?
हरभजनने ट्विटमध्ये लिहिले आहे की, ‘खराब अंपायरिंग आणि चुकीचे नियम पाकिस्तानला महागात पडले. आयसीसीने हा नियम बदलण्याची गरज आहे. जर चेंडू स्टंपला लागला तर तो आऊट द्यायला हवा, मैदानावरील अंपायरने तो आऊट दिला की नाही, याने फरक पडत नाही. तसे नसेल तर तंत्रज्ञानाचा काय उपयोग?’

महत्वाच्या बातम्या-

मी पुन्हा येईन… फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? भाजपाकडून संकेत

सणासुदीत कांद्याने केला वांदा, भाव गगनाला भिडले

मंदिर वही बनायेंगे : या दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार