दक्षिण आफ्रिकी क्रिकेटर निघाला बजरंगबलीचा मोठा भक्त; पाकिस्तानला हरवल्यानंतर म्हणाला, ‘जय श्री हनुमान’

Keshav Maharaj: विश्वचषक 2023 च्या 26 व्या सामन्यात दक्षिण आफ्रिकेने रोमहर्षक सामन्यात पाकिस्तानचा एक विकेटने पराभव केला. क्रिकेटपटू केशव महाराज याने आफ्रिकन संघाला विजय मिळवून देण्यात महत्त्वाची भूमिका बजावली. 21 चेंडूत त्याने सात नाबाद धावा केल्या, तरीही त्याने कोणत्या परिस्थितीत धावा केल्या हे खूप महत्त्वाचे आहे. तत्पूर्वी महाराजने नऊ षटके फेकताना 56 धावा दिल्या, ज्यादरम्यान त्याला एकही विकेट मिळवता आली नाही. पण त्याने निर्माण केलेल्या दडपणामुळे पाकिस्तानी फलंदाजाने दुसरा फिरकी गोलंदाज तबरेझ शम्सीविरुद्ध जोखीम पत्करण्याचा प्रयत्न केला आणि विकेट गमावली.

केशव महाराजने पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यातील मोलाच्या योगदानानंतर सोशल मीडियावर पोस्ट केली आहे. त्याने लिहिले की, ‘मी देवावर विश्वास ठेवतो. माझ्या संघाने किती चमकदार क्रिकेट खेळले. शम्सी आणि मार्करमची कामगिरी पाहून खूप छान वाटले. जय श्री हनुमान (Jai Shri Hanuman).’ केशव महाराजची ही पोस्ट सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. एवढेच नाही तर त्याच्या बॅटवर लिहिलेल्या ‘ओम’चेही खूप कौतुक होत आहे.

महत्वाच्या बातम्या-

मी पुन्हा येईन… फडणवीस पुन्हा महाराष्ट्राच्या मुख्यमंत्रीपदी विराजमान होणार? भाजपाकडून संकेत

सणासुदीत कांद्याने केला वांदा, भाव गगनाला भिडले

मंदिर वही बनायेंगे : या दिवशी रामलल्ला गर्भगृहात विराजमान होणार