हिरो झाला झिरो : IPL लिलावात ‘या’ खेळाडूला करोडोंचे नुकसान झाले

IPL 2024 Auction Update: जगातील सर्वात श्रीमंत क्रिकेट लीग IPL च्या पुढील हंगामापूर्वी दुबईमध्ये एक मिनी-लिलाव आयोजित केला जात आहे. दरवर्षी आयपीएल लिलावात अनेक खेळाडू श्रीमंत होतात. मात्र यावेळी 24 वर्षीय खेळाडूला लिलावात मोठा फटका बसला आहे. या खेळाडूला 9.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

इंग्लंडचा फलंदाज हॅरी ब्रूक (Harry Brook) आयपीएलच्या आगामी हंगामात दिल्ली कॅपिटल्सकडून खेळणार आहे. यावेळी तो लिलावात आला असून त्याची मूळ किंमत 2 कोटी रुपये आहे. दिल्ली कॅपिटल्ससह राजस्थान रॉयल्सनेही हॅरी ब्रूकवर बोली लावली. पण दिल्ली कॅपिटल्सने हॅरी ब्रूकला 4 कोटी रुपयांना विकत घेतले. हॅरी ब्रूकला 4 कोटी रुपये मिळाले असतील पण त्यालाही 9.25 कोटी रुपयांचे नुकसान झाले आहे.

गेल्या वर्षी आयपीएल लिलावात हॅरी ब्रूकवर पैशांचा वर्षाव झाला होता. लिलावात 24 वर्षीय फलंदाज हॅरी ब्रूकला सनरायझर्स हैदराबादने 13.25 कोटी रुपयांना विकत घेतले. त्याची मूळ किंमत दीड कोटी रुपयांपेक्षा कितीतरी पटीने जास्त किंमतीला विकली गेली. मात्र यावेळी त्याची किंमत वाढवण्यात अपयश आले.

हॅरी ब्रूकने आयपीएल 2023 मध्ये 11 सामने खेळले. या 11 सामन्यांमध्ये हॅरी ब्रूकने 21.11 च्या सरासरीने केवळ 190 धावा केल्या होत्या. या काळात त्याने एक शतकही झळकावले, मात्र उर्वरित सामन्यांमध्ये त्याला चांगली कामगिरी करता आली नाही. त्यामुळे त्याला प्लेइंग 11 मधूनही वगळण्यात आले.

महत्वाच्या बातम्या-

रामदास आठवले यांचा वाढदिवस रिपब्लिकन पक्षातर्फे संघर्षदिन म्हणून देशभर साजरा होणार

‘छत्रपती शिवाजी महाराज शेतकरी सन्मान योजनेच्या कर्जमाफीपासून वंचित साडे सहा लाख शेतकऱ्यांना कर्जमाफीचा लाभ मिळणार’

राज्यातील बळीराजाला दीड वर्षांत ४४ हजार २७८ कोटी रुपयांची विक्रमी मदत