आघाडी कायम राहावी आणि देवीचा कायम कृपा आशिर्वाद आमच्या वर राहावा असे साकडे घातले – चव्हाण

तुळजापूर – देवीने आशिर्वाद महाराष्ट्रावर राहावा आमच्या हातुन चांगले कामे व्हावेत असे साकडे आपण देवीला घातल्याची माहीती राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंञी अशोक चव्हाण यांनी सोमवार दि. २८ रोजी श्रीतुळजाभवानी दर्शना नंतर पत्रकारांशी  बोलताना दिली.

सोमवार सकाळी तिर्थक्षेञ तुळजापूरात दाखल होवुन थेट देवीचे सहकुंटुंब दर्शन घेत पुजा केली. यावेळी पत्रकारांशी बोलताना चव्हाण म्हणाले की श्रीतुळजाभवानी आमचे कुलदैवत असुन दरवर्षी देविदर्शनार्थ येत असतो पण कोरोना मुळे दोन वर्ष येवू  शकलो नाही आज आलो देविदर्शन घेतले.

देवीला मी माझ्या साठी काहीही मागितले नाही तर महाराष्ट्रात आमच्या सरकारच्या माध्यमातून चांगले कामे व्हावेत, महाराष्ट्र सध्या प्रगती साधत आहे विकासात आघाडीवर आहे ही आघाडी कायम राहावी आणि देवीचा कायम कृपा आशिर्वाद आमच्या वर राहावा असे साकडे घातल्याचे यावेळी म्हणाले.