संसदेच्या विशेष अधिवेशनात मराठा आरक्षण विषय घ्या, ५०%ची मर्यादा वाढवावी- प्रवक्त्या विद्याताई चव्हाण

Vidya Chavan: राज्यात गेल्या अनेक दिवसांपासून मराठा आरक्षणासंदर्भात (Maratha Reservation) आंदोलने उपोषणे सुरू आहे. राज्य सरकारने केंद्राकडे मागणी करून 18 ते 22 सप्टेंबर दरम्यान होणाऱ्या विशेष अधिवेशनात 50% ची मर्यादा वाढवून द्यावी जेणेकरून मराठा समाजाला 16 टक्के आरक्षण देण्याचा मार्ग मोकळा होईल. देशातील इतर 8 राज्यांमध्ये देखील 50% अट ही सुप्रीम कोर्टाने (इंदिरा सहानी) काढून दिलेल्या अटीमुळे आरक्षण देण्यास अडथळा येत आहे. मोदी (Narendra Modi) है तो मुमकिन है म्हणणाऱ्या भाजपला आम्हाला सांगायचं आहे की तुम्ही आता हे संसदेत करून घेणार का? असा प्रश्न देखील राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्या तथा प्रवक्त्या विद्याताई चव्हाण (Vidya Chavan) यांनी प्रसारमाध्यमांशी बोलताना म्हटले आहे.

भाजप केवळ मताच्या राजकारणाकरिता जाती-जातीमध्ये तेढ निर्माण करण्याचे काम करत असते भाजप नेत्यांना जर मराठा समाजाला खरंच आरक्षण द्यायचं असेल तर त्यांनी संसदेचे होणारे विशेष अधिवेशनात हा मुद्दा मार्गी लावावा. ओबीसी, मराठा असं भांडण लावण्याचं काम सरकार आरक्षणाच्या माध्यमातून करत आहे.धनगरा चे आरक्षण हे केंद्रामध्ये ‘धनगड’ हे म्हटल्यामुळे थांबलेले आहे . त्यासाठी सुधारणा करून घेण्याचे काम या विशेष अधिवेशनात करून घेण्याचे आवश्यक आहे. आरक्षणाचा मुद्दा धरून भाजप केवळ राजकारण करू पाहत आहे असेही विद्याताई चव्हाण यांनी बोलताना म्हटले आहे

विद्याताई चव्हाण पुढे म्हणाल्या की आझाद मैदानात सुद्धा लोक उपोषणाला बसलेले आहेत. तिथे उपोषणाला बसलेल्या आंदोलकांना 4 दिवसात सरकारने भेट सुद्धा दिलेली नाही. आझाद मैदान ते मंत्रालय हे हाकेच्या अंतरावर आहे. मात्र कोणीही साधी दखल सुद्धा घेत नाही तरुण मंडळींचे उपोषण सरकारने सोडवण हे गरजेचं आहे. पण राज्य सरकारला सर्वसामान्य जनतेचे काहीही देणंघेणं नाही आहे. सरकार केवळ समाजा समाजात जातीय तेढ निर्माण करत आहेत असे विद्याताई चव्हाण यांनी यावेळी स्पष्ट केले आहे.

महत्त्वाच्या बातम्या-
तुम्ही PIN शिवाय 500 रुपये पाठवू शकता, Paytm वर UPI Lite सक्रिय करण्याची प्रक्रिया जाणून घ्या

पाकिस्तान जिंकेल वनडे विश्वचषक, शोएब अख्तरने व्यक्त केला विश्वास; म्हणाला, भारत…

रामोशी, बेरड समाजाच्या सर्वांगिण विकासासाठी शासन कटीबद्ध – उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस