लग्नासाठी कसा मुलगा पाहिजे? ‘सबसे कातील’ गौतमी पाटीलने सांगितली तिची आवड

Pune: ‘सबसे कातिल गौतमी पाटील’ (Gautami Patil), ‘गौतमीकी झलक सबसे अलग’….. सध्या लावणी म्हटलं की सगळ्यात पहिल्यांदा नाव समोर येतं ते म्हणजे गौतमी पाटीलचं. अश्लील डान्समुळे चर्चेत आलेल्या गौतमीच्या नृत्यानं संपूर्ण महाराष्ट्राला वेड लावलयं. गौतमीची क्रेझ इतकी आहे की आता मोठमोठ्या कलाकारांचे कार्यक्रम सोडून प्रेक्षक गौतमीचे कार्यक्रम पाहण्यास गर्दी करतात. गौतमीच्या डान्ससह ती वैयक्तिक आयुष्यामुळेही चर्चेत असते.

गौतमीचे कुटुंबीय, तिच्या आवडीनिवडी याबद्दल जाणून घेण्याची नेहमीच लोकांना उत्सुकता असते. अशातच गौतमीने ‘द ऑड इंजिनियर’ या सोशल मीडिया चॅनलला एक मुलाखत दिली. या मुलाखतीमध्ये तिने वेगवेगळ्या प्रश्नांची तिच्या हटके स्टाईलमध्ये उत्तरं दिली आहेत. यादरम्यान तिने आपल्याला लग्नासाठी कसा मुलगा हवा?, याबद्दलही सांगितले.

अशातच आपल्याला जबाबदाऱ्या उचलणारा आणि समजून घेणारा मुलगा हवा आहे, असं तिने ‘दॅट ऑड इंजिनिअर’ला दिलेल्या मुलाखतीत सांगितलं.