आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडाखा लगावणाऱ्या चीअरलीडर्सना किती पगार मिळतो? एका सामन्यासाठी हजारोंत घेतात पैसे

इंडियन प्रीमियर लीग म्हणजेच आयपीएलचा 16वा हंगाम सुरू आहे. त्याचा उत्साह दिवसेंदिवस वाढत आहे. या आयपीएलमध्ये ग्लॅमरचा तडाखा लगावण्यासाठी चीअरलीडर्स पुन्हा एकदा मैदानात उतरल्या आहेत. कोरोना महामारीमुळे मागील दोन हंगामात चीअरलीडर्स दिसल्या नव्हत्या. परंतु यंदा चीअरलीडर्सचा सहभाग असून आयपीएलमधील बहुतांश चीअरलीडर्स परदेशी आहेत. तर काही भारतीय चेहरेही दिसत आहेत. चीअरलीडर्सना किती पैसे मिळतात? हा प्रश्न अनेकांच्या मनात नक्कीच निर्माण झाला असेल. आज आपण फक्त चीअरलीडर्सची कमाई (IPL Cheerleaders Salary) आणि पगार याबद्दल बोलू…

आयपीएल 2023 मधील चीअरलीडर्सचा पगार
मीडिया रिपोर्ट्सनुसार, चीअरलीडर्सना प्रत्येक सामन्यासाठी पैसे मिळतात. त्यांना एका सामन्यासाठी 14 ते 17 हजार रुपये मिळतात. आयपीएल संघानुसार हा आकडा बदलत जातो. क्रिकफॅक्ट्सच्या अहवालात असे म्हटले आहे की चेन्नई सुपर किंग्ज, पंजाब किंग्ज, सनरायझर्स हैदराबाद, दिल्ली कॅपिटल्स यांसारखे संघ त्यांच्या चीअरलीडर्सना प्रति सामन्यासाठी 12,000 रुपयांपेक्षा जास्त पैसे देतात.

मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरसारखे संघ चीअरलीडर्सना सुमारे 20,000 मानधन देतात. केकेआरच्या चीअरलीडर्सना सर्वाधिक पैसे मिळतात, जे सुमारे 24,000 रुपये आहेत. याशिवाय चांगल्या कामगिरीवर किंवा संघ जिंकल्यावर बोनसही मिळतो. पगाराव्यतिरिक्त, चीअरलीडर्सची राहण्याची आणि जेवणाची लक्झरी व्यवस्था असते.

चीअरलीडर्स कसे निवडले जातात?
चीअरलीडर म्हणून नोकरी मिळवणे ही एक कठीण प्रक्रिया आहे. त्यासाठी मुलाखत आणि लेखी परीक्षेला सामोरे जावे लागते. चीअरलीडरला गर्दीसमोर नृत्य, मॉडेलिंग आणि परफॉर्म करण्याचा अनुभव असावा लागतो.