Hemant Rasane | कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित विकासकामे मार्गी लावण्यासाठी हेमंत रासनेंनी घेतली आयुक्तांची भेट

Hemant Rasane : कसबा विधानसभा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि प्रलंबित विकासकामे पूर्ण करण्यासाठी भाजपा कसबा मतदारसंघ निवडणूक प्रमुख हेमंत रासने (Hemant Rasane) यांनी पुणे महानगरपालिकेच्या आयुक्तांची भेट घेत निवेदन दिले आहे. यामध्ये प्रामुख्याने रस्त्यांचे डांबरीकरण आणि दुरुस्ती, पाणीपुरवठा व्यवस्था, वीजपुरवठा सुधारणे, ड्रेनेज लाईन दुरुस्ती, कचरा व्यवस्थापन, सार्वजनिक शौचालये आदी मागण्यांचा समावेश आहे. यावेळी मतदारसंघातील विविध भागांमध्ये प्रलंबित असलेल्या विकासकामांची यादीही निवेदनात देण्यात आली.

हेमंत रासने म्हणाले, “कसबा मतदारसंघातील नागरिकांच्या समस्या आणि गरजा पूर्ण करण्यासाठी मी सदैव प्रयत्नशील आहे. त्यासाठी मी नियमितपणे पुणे महापालिका आणि इतर संबंधित विभागांशी संपर्कात आहे. गेल्या वर्षभरात अनेक कामेही पुणे महानगपालिकेच्या माध्यमातून पूर्ण झाली. परंतु महापालिका आयुक्तांना निवेदन देऊन मतदारसंघातील अजून काही प्रलंबित विकासकामे आणि नागरिकांच्या समस्या यावर चर्चा करून त्या लवकरात लवकर पूर्ण करण्याची मागणी केली. यावेळी अतिरिक्त आयुक्त रवींद्र बिनवडे (Ravindra Binawade) यांनी निवेदन स्वीकारत सर्व कामे पूर्ण होतील, असे आश्वासन दिले आहे”

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

यावेळी कसबा विधानसभा निवडणूक प्रमुख हेमंत भाऊ रासने यांच्यासोबत कसबा मतदार संघाचे अध्यक्ष राजेंद्र काकडे, सरचिटणीस अमित कंक, राजू परदेशी, प्रणव गंजीवाले, प्रशांत सुर्वे, वैशालीताई नाईक, महिला आघाडी अध्यक्ष अश्विनीताई पवार, संजय मामा देशमुख प्रभाग अध्यक्ष भारत जाधव, अभिजीत रजपूत, सनी पवार, भस्मराज तिकोने, संदीप इंगळे, जयदीप शिंदे, माधव साळुंखे, अभिषेक मारणे, संकेत थोपटे, सिद्धेश पांडे, तन्मय ओझा तसेच कसबा मतदारसंघातील भाजपा पदाधिकारी आणि कार्यकर्ते उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या : 

Maharashtra Politics | ‘गेली शिवशाही, आली गुंडशाही’ , विरोधकांकडून विधीमंडळाच्या पायऱ्यांवर सरकारचा जोरदार निषेध

जरांगेंच्या आंदोलनाशी संबंध नाही, दोषी असेन तर राजकारणातून संन्यास घेईन : Rajesh Tope

Interim Budget | राज्याची अर्थव्यवस्था एक ट्रिलीयन डॉलर करण्यासाठी आवश्यक ध्येयधोरणांची अर्थसंकल्पातून अंमलबजावणी