Babasaheb Bhagwan Torane | बाराशे लोकसंख्येचे गाव ३ महिन्यांपासून पाण्यापासून वंचित, वयोवृद्ध मंडळींना पाण्यासाठी यावे लागते करमाळ्याला

Babasaheb Bhagwan Torane | बाराशे लोकसंख्या असलेल्या दाही खिंडी गावात प्रचंड भीषण पाणीटंचाई झाली असून पिण्याच्या पाण्यासाठी पाच किलोमीटर अंतरावरील करमाळा शहरात यावे लागत आहे. प्रशासन अद्याप दुर्लक्ष करीत असल्यामुळे येथील वयोवृद्धासह करमाळा तहसील कचेरी समोर आमरण उपोषणास बसण्याचा इशारा भाई धायेखिंडी शिवसेना शाखाप्रमुख बाबासाहेब भगवान तोरणे (Babasaheb Bhagwan Torane) यांनी दिला आहे.

या निवेदनावर सुंदरदास लांडगे, दिलीप बाळनाथ सूळ यांच्या स्वाक्षरी आहेत. दाई खिंडी हे गाव ग्रुप गम ग्रामपंचाय,त पांडे ग्रुप ग्रामपंचायतमध्ये येत असून या ठिकाणी ग्रामसेवक कधीही येत नाही. गेल्या तीन महिन्यांपासून पाण्याचा तुटवडा असताना ग्रामसेवकांनी याची माहिती कोणत्याही गटविकास अधिकारी किंवा तहसीलदार यांना दिली नाही. तालुक्यात इतर ठिकाणी पाण्याचे टँकर चालू झाले. पण दाहीखिंडी येथे पाण्याचा टँकर चालू झाला नाही.

गावातील अनेक तरुण मंडळी पुणे-मुंबई सारख्या ठिकाणी नोकरीला गेलेले आहेत. गावात जवळपास सर्व वृद्ध मंडळी राहतात. अत्यंत कमी लोकसंख्येचे गाव असल्यामुळे राजकीय नेते मंडळीकडे या गावाकडे दुर्लक्ष करतात. या गावात 90% धनगर समाजाची लोक राहतात, आता या प्रश्नात गट विकास अधिकारी म्हणून मनोज राऊत यांनी लक्ष घालून या गावाच्या पिण्याच्या पाण्याचा प्रश्न सोडवावा अशी मागणी नागरिकांनी केली आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

पुणे तिथे काय उणे? पुण्यासाठी मोहोळ, धंगेकर, मोरे आले एकत्र

Prakash Ambedkar | वंचितला अजून पाठींबा दिलेला नाही, मनोज जरांगेंनी फेटाळला प्रकाश आंबेडकरांचा दावा

Mumbai LokSabha | मुंबईतील सहापैकी चार लोकसभा मतदारसंघ ठाकरे गटाकडे, कोणा कोणाला मिळालं तिकीट?