प्रत्येक पदाधिकाऱ्याने सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करा; अजितदादांच्या पदाधिकाऱ्यांना सूचना

Ajit Pawar – राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या प्रमुख उपस्थितीत आणि प्रदेशाध्यक्ष खा. सुनिल तटकरे (Sunil Tatkare) यांच्या अध्यक्षतेखाली महिला विकास मंडळ सभागृह, मुंबई येथे पार्टीच्या पदाधिकाऱ्यांची मॅरेथॉन बैठक आयोजित करण्यात आली. आगामी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर आयोजित केलेल्या या बैठकीत प्रदेश पदाधिकारी, जिल्हाध्यक्ष, फ्रंटल व सेलचे राज्यप्रमुख, महिला, युवती, विद्यार्थी, प्रवक्ते व सोशल मीडिया यांच्या कार्याचा पक्षश्रेष्ठींनी आढावा घेतला.

प्रत्येक विभागाच्या आढावा बैठकीत विभागाची प्रत्येक जिल्हा पातळीवरील सद्यस्थिती अजितदादा आणि प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे यांनी एकत्रित जाणून घेतली. पक्षसंघटना अधिक सक्षम करण्यासाठी सर्व पदाधिकाऱ्यांनी सक्रिय होणे गरजेचे आहे. सध्या सोशल मीडियाचा प्रभाव मोठ्या प्रमाणावर वाढला आहे. या काळात प्रत्येक पदाधिकाऱ्याने सोशल मीडियाचा वापर जास्तीत जास्त प्रमाणात करावा असे आवाहन पवार यांनी सर्व पदाधिकाऱ्यांना केले.

यावेळी प्रदेशाध्यक्ष सुनिल तटकरे पदाधिकाऱ्यांशी संवाद साधताना म्हणाले की, आपल्या पक्षाचा प्रत्येक जिल्हा आणि प्रदेश पदाधिकारी हा प्रमुख घटक आहेत. ज्यावेळी तुमच्यावर जिल्हाध्यक्ष पदाची जबाबदारी सोपवली जाते त्याचा अर्थ त्या जिल्ह्यातील संघटनेचे प्रमुख तुम्ही आहात. पक्षाबाबत भविष्यातील जनमत कशा पद्धतीने वाढेल याची जबाबदारी प्रदेश आणि जिल्हा पदाधिकाऱ्यांची असते. यासाठी पक्षाच्या अधिकृत सोशल मीडिया माध्यमांना फॉलो करण्याचे आवाहन प्रदेशाध्यक्षांनी यावेळी केले.

यावेळी मुंबई विभागीय राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष समीर भुजबळ, महिला व बालविकास मंत्री आदिती तटकरे, प्रदेश सरचिटणीस शिवाजीराव गर्जे, मुंबई प्रदेश उपाध्यक्ष प्रमोद हिंदुराव, आमदार बाबाजानी दुर्राणी, आमदार अमोल मिटकरी, महिला प्रदेशाध्यक्ष रुपालीताई चाकणकर, युवक प्रदेशाध्यक्ष सुरज चव्हाण, प्रदेश प्रवक्ते आनंद परांजपे, प्रदेश प्रवक्ते संजय तटकरे, प्रदेश प्रवक्ते उमेश पाटील, प्रदेश प्रवक्ते प्रशांत पवार, सहकोषाध्यक्ष संजय बोरगे, प्रदेश सरचिटणीस लतिफ तांबोळी, मुंबई कार्याध्यक्ष नरेंद्र राणे, माजी महिला प्रदेशाध्यक्ष सुरेखा ठाकरे, विद्यार्थी प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम, ओबीसी सेल प्रदेशाध्यक्ष कल्याण आखाडे, सामाजिक न्याय विभाग राज्यप्रमुख सुनील मगरे, अल्पसंख्याक सेल राज्यप्रमुख इद्रिस नायकवडी, सोशल मीडिया सेल राज्यप्रमुख सुदर्शन जगदाळे, राष्ट्रवादी सेवादल राज्यप्रमुख राजेंद्र लावंघरे, ओबीसी राज्य समन्वयक ईश्वर बाळबुधे, माजी सैनिक सेल राज्यप्रमुख दीपक शिर्के, वैद्यकिय कक्ष राज्यप्रमुख राजीव सातव, गडकिल्ले संवर्धन सेलचे राज्यप्रमुख योगेश शेलार, सांस्कृतिक सेल राज्यप्रमुख बाबा पाटील, डॉक्टर सेल राज्यप्रमुख डॉ.बाळासाहेब पवार, मच्छीमार सेल राज्यप्रमुख चंदू पाटील, रोजगार व स्वयंरोजगार सेल राज्यप्रमुख मेघा पवार, ज्येष्ठ नागरिक सेल राज्यप्रमुख सोनबा चौधरी, हिंदी भाषिक सेल राज्यप्रमुख पारासनाथ तिवारी, युवती विभागाच्या सर्व विभागीय अध्यक्षा तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली