‘जिथे जिथे INDIA आघाडीचे सरकार स्थापन होईल तिथे इस्लामिक कायदा लागू केला जाईल’

Congress In Karnataka : कर्नाटकचे काँग्रेस सरकार शाळा आणि महाविद्यालयांमधून हिजाब बंदीचा जुना आदेश मागे घेणार आहे. कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी राज्यातील हिजाबवरील बंदी मागे घेण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे. ते म्हणाले की, महिलांना काहीही परिधान करण्याचे स्वातंत्र्य आहे.

काँग्रेसपूर्वी कर्नाटकात भाजपचे सरकार होते ज्यांनी शैक्षणिक संस्थांमध्ये हिजाबवर बंदी घातली होती. भाजपच्या या आदेशानंतर संपूर्ण राज्यात खळबळ उडाली होती. सिद्धरामय्या यांच्या आदेशानंतर 23 डिसेंबरपासून कर्नाटकातील हिजाब बंदीचा नियम रद्द होणार आहे. सीएम सिद्धरामय्या यांनी त्यांच्या म्हैसूर सभेत ही घोषणा केली आहे. भाजपवर हल्लाबोल करताना ते म्हणाले की, भाजप कपडे, पोशाख आणि जातीच्या नावावर लोकांना वेगळे करते. सत्तेत आल्यानंतर काँग्रेसने ही बंदी मागे घेण्याचे संकेत दिले होते.

कर्नाटकचे मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी शाळांमध्ये हिजाब घालण्यावरील बंदी उठवण्याची घोषणा करताच यावरून पुन्हा एकदा राजकारण सुरू झाले आहे. कर्नाटक सरकारच्या या निर्णयाला भाजपने कडाडून विरोध केला आहे. भाजपचे फायरब्रँड नेते आणि केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह यांनी कर्नाटक सरकारवर जोरदार हल्लाबोल केला आहे. गिरिराज सिंह यांनी याला इस्लामिक स्टेटची सुरुवात म्हटले आहे. ते म्हणाले की, काँग्रेस भारताला इस्लामिक राज्य म्हणून ब्रँडिंग करण्यास तयार आहे.

गिरीराज सिंह म्हणाले की, काँग्रेसच्या कर्नाटक सरकारने हिजाबवर घातलेली बंदी हटवली आहे. त्यांचा उद्देश केवळ हिजाबवरील बंदी हटवणे नाही तर शरिया कायदा प्रस्थापित करणे हा आहे. जिथे जिथे INDIA आघाडी आणि राहुल गांधी यांचे सरकार स्थापन होईल तिथे इस्लामिक कायदा आणि शरिया कायदा लागू केला जाईल. ते म्हणाले की, कर्नाटकात सिद्धरामय्या यांनी घातलेली हिजाबवरील बंदी उठवण्यास भाजपचा विरोध आहे. सनातनच्या विनाशाची ही नियोजित पद्धत आहे.

महत्वाच्या बातम्या-

जम्मू-काश्मीरमध्ये लष्करी वाहनांवर दहशतवाद्यांचा हल्ला,4 जवान शहीद

कोरोना जेएन-वन व्हेरिएंट: मुख्यमंत्र्यांकडून आरोग्य यंत्रणेच्या सज्जतेचा आढावा

डॉ. प्रभा अत्रे, डॉ. प्रमोद चौधरी यांना उपमुख्यमंत्र्याच्या हस्ते मिळणार ‘अटल संस्कृती गौरव पुरस्कार’

“लोकशाही बसली धाब्यावर! हुकुमशाहीचा उदय की…”, संसदेतून १४१ खासदारांचं निलंब; तेजस्विनी पंडित संतापली