‘जे मुस्लिमांच्या धर्मग्रंथात सांगितले आहे ते सांगितल्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना कशा दुखावू शकतात?’

मुंबई – मुंबई पोलिसांनी भाजपच्या राष्ट्रीय प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात एफआयआर नोंदवला आहे. प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याचा आरोप त्यांच्यावर आहे. एका वृत्तवाहिनीच्या कार्यक्रमात प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त वक्तव्य केल्याने मुंबई पोलिसांनी त्याच्यावर गुन्हा दाखल केला आहे. धार्मिक भावना दुखावणे, द्वेष पसरवणे आणि इतर धर्मांबद्दल आक्षेपार्ह टिप्पणी केल्याप्रकरणी नुपूर यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी सांगितले की, सुन्नी बरेलवी संघटनेने रझा अकादमीने नुपूर शर्मांविरोधात तक्रार दाखल केली आहे. वास्तविक नुपूर शर्मा ज्ञानवापी मशिदीवर सुरू असलेल्या चर्चेत सहभागी होण्यासाठी गेल्या होत्या. त्याचवेळी त्यांनी पैगंबर मोहम्मद यांच्याबाबतीत काही कमेंट केली. तेव्हापासून त्यांच्यावर कारवाईची मागणी होत होती.  चर्चेदरम्यान नुपूर शर्मा म्हणाल्या होत्या की जर लोक सतत हिंदू धर्माची खिल्ली उडवत असतील तर ती इस्लामची उडवली जाऊ शकते. यानंतर त्यांनी प्रेषित मोहम्मद यांच्याशी संबंधित एका घटनेचा यावेळी उल्लेख केला. त्यांच्या वक्तव्याचा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला आणि एकच गोंधळ सुरू झाला.

या प्रकरणानंतर नुपूर शर्मा यांना अनेक धमक्या आल्या. त्यांना मिळणाऱ्या धमक्यांबाबत ट्विटरवर माहिती देताना त्यांनी दिल्ली पोलिसांना इस्लामिक कट्टरपंथींकडून धमक्या दिल्याची माहिती दिली. त्याचवेळी नुपूर यांनी सांगितले की, काही लोक त्याचे मस्तक कापण्याची धमकीही देत आहेत. नुपूर शर्मा यांनी त्यांच्या ट्विटर अकाऊंटवर त्या धमकीच्या पोस्टचा स्क्रीनशॉट टाकून दिल्ली पोलिसांना टॅग केले आणि त्यांना या प्रकरणाची दखल घेण्यास सांगितले.

नूपुर यांनी Alt News च्या सह-संस्थापकावर स्वतःला या धमक्यांचा आरोप केला आहे. मोहम्मद जुबेरच्या चिथावणीमुळे आपल्याला जीवे मारण्याच्या धमक्या येत आहेत, कारण जुबेरने आपले भाषण ट्विट करून ट्विटरवर टाकले होते, त्यानंतर त्यांना या धमक्या येत असल्याचे म्हटले आहे.

दरम्यान, या सर्व प्रकारावर आता भाजयुमोचे नेते प्रदीप गावडे यांनी भाष्य केले आहे. जे मुस्लिमांच्या धर्मग्रंथात सांगितले आहे ते सांगितल्याने मुस्लिमांच्या धार्मिक भावना कशा दुखावू शकतात? मोहंमद पैगंबरानी 6 वर्षे वय असणाऱ्या आयेशाशी निकाह केला होता हे एका चर्चेत सांगितल्यामुळे मुंबई पोलिसांनी BJP प्रवक्त्या नुपूर शर्मा यांच्यावर गुन्हा दाखल केला आहे. असं त्यांनी म्हटले आहे.