Pune Congress | हद्द झाली ! फ्लेक्सवर फोटो नसल्याने मंडपवाल्याला मारहाण; पुणे काँग्रेसमध्ये चाललंय काय ?

पुणे काँग्रेसमध्ये (Pune Congress) आमदार रवींद्र धंगेकर यांना उमेदवारी जाहीर झाल्यापासून गटबाजीला उधाण आल्याचे चित्र आहे. कोणी उमेदवारी मिळालं नाही म्हणून नाराज आहे. कोणीही उमेदवारावर नाराज आहे. तर कोणी मानपानावरून नाराज आहे. त्यामुळे पुणे काँग्रेसमध्ये रोज नवीन एक नाराजी नाट्याचे रोज नवे प्रयोग पाहायला मिळत आहेत.

उमेदवारी न मिळाल्याने निष्ठावांतांना डावलत असल्याचं सांगत काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आबा बागुल यांनी काँग्रेस भवन  (Pune Congress)येथे आंदोलन केल्याचं सर्वांनीच पाहिलं.  केसरी वाड्यात पार पडलेल्या बैठकीत देखील नाराजी नाट्य सुरूच राहिलेले दिसून आले. त्यानंतर आता माध्यमांनी दिलेल्या वृत्तानुसार, बैठकीसाठी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर “नेत्याचा” फोटो टाकला नाही, म्हणून मंडपवाल्याला मारहाण करण्यात आल्याचं समोर आलं आहे.

कॅन्टोन्मेंट भागामध्ये शुक्रवारी सायंकाळी काँग्रेसची बैठक पार पडली या बैठकीच्या ठिकाणी लावण्यात आलेल्या फ्लेक्सवर काँग्रेसचे एक नेते आणि माजी राज्यमंत्री यांचा फोटो नव्हता. त्यामुळे संतापलेल्या कार्यकर्त्यांनी टोकाचं पाऊल उचललं. त्यांनी फ्लेक्सवर फोटो नसल्याचं निदर्शनास आल्यानंतर मेळावा सुरू होण्यापूर्वीच संबंधित नेत्याच्या कार्यकर्त्यांनी मंडपवाल्याला जाब विचारला. त्याला मारहाण केल्याचं बोललं जात आहे. दरम्यान, या घटनेमुळे अनेक उलटसुलट चर्चा सुरु असून या सर्व घटनांमुळे रवींद्र धंगेकर यांची मात्र निश्चितच डोकेदुखी वाढणार आहे.

आपल्या भागातील बातम्या जाणून घेण्यासाठी जॉइन करा आझाद मराठीचा’चा व्हॉट्सअ‍ॅप ग्रुप

महत्वाच्या बातम्या :

Murlidhar Mohol | आम्हाला पडणारं मतदान निश्चित आहे; मोहोळांबाबत धीरज घाटेंनी व्यक्त केला विश्वास

Shirur LokSabha 2024 | शिरूर लोकसभा मतदारसंघात कुणाचे पारडे जड? राजकीय गणितं काय ?

लोकसभा निवडणुकीसाठी भाजपाचे ‘बूथ विजय अभियान’, प्रत्येक बुथवर ३७० मते वाढविण्याचा निर्धार