पावसाळ्याच्या दिवसात नळाला येणारे गढूळ पाणी ‘असे’ करा स्वच्छ, पाहा सोपे घरगुती उपाय!

Water Cleaning at Home: पावसाळ्यात घाणेरडे पाणी ही एक सामान्य समस्या आहे. पण तरीही अनेकांना त्याचे उपाय माहित नाहीत. तसे, जवळपास प्रत्येक घरात पिण्याचे पाणी फिल्टर करण्यासाठी प्युरिफायर वापरले जातात. पण सहसा लोक अंघोळीसाठी आणि इतर कामांसाठी वापरल्या जाणार्‍या पाण्याच्या अस्वच्छतेकडे फारसे लक्ष देत नाहीत.

अशा परिस्थितीत, आम्ही तुम्हाला सांगतो की, घाणेरडे किंवा प्रदूषित पाण्याचे दुष्परिणाम केवळ ते पिण्यानेच होत नाहीत तर आंघोळ आणि हात पाय धुण्याने देखील होतात. त्यामुळे पावसाळ्याच्या दिवसात लोकांना त्वचेची आणि डोळ्यांची अॅलर्जी जास्त असते. या आरोग्याच्या समस्यांमुळे तुम्हाला त्रास होऊ नये, म्हणून आज आम्ही तुम्हाला नळाचे पाणी स्वच्छ आणि शुद्ध करण्याचे घरगुती उपाय सांगत आहोत.

नळाच्या तुटीवर कार्बन फिल्टर लावा
कार्बन फिल्टर नळावर बसतात, जे पाणी फिल्टर करतात. प्रत्येकजण ते खरेदी करू शकतो, कारण ते फार महाग नाही. हे फिल्टर लावून आपल्याला पाण्यातील घाण काढण्यासाठी वेगळे काहीही करण्याची आवश्यकता नाही. कारण ते पाण्यात असलेले विविध प्रकारचे प्रदूषक, रेडॉन, क्लोरीन, बॅक्टेरिया आणि शिसे सारखे धातू स्वच्छ करण्यास सक्षम आहे.

आंघोळीचे पाणी कसे स्वच्छ करावे
शॉवरचे पाणी स्वच्छ करण्यासाठी तुम्ही शॉवर फिल्टर वापरू शकता. हे शॉवर हेडमध्ये लावू शकता. जेणेकरून पाणी फिल्टर केल्यावर सरळ बाहेर येईल. पाण्यातील क्लोरीन, क्लोरामाइन आणि इतर दूषित घटक काढून टाकण्यासाठी हे फिल्टर प्रभावी आहे. अशा परिस्थितीत, पावसाळ्याच्या दिवसात पाण्यामधून येणारा विचित्र वास, चव आणि रंग बर्‍याच प्रमाणात सुधारतो, जो तुमच्या त्वचेसाठी आणि केसांसाठी आरोग्यदायी असतो.

नळाचे पाणी स्वच्छ आणि रसायनमुक्त करा
जर नळाचे पाणी स्वच्छ बाहेर येत नसेल, तर तुम्ही ते साफ करण्यासाठी सोडियम एस्कॉर्बेट पावडर वापरू शकता. तुम्ही ते दुकानातून सहज खरेदी करू शकता, तसेच ते वापरण्यासही सोपे आहे. आंघोळीच्या किंवा वापरण्याच्या सुमारे 5 मिनिटे आधी बादलीत साठवलेल्या पाण्यात ¼ टीस्पून सोडियम एस्कॉर्बेट घालावे लागेल.

असे स्वच्छ करा पिण्याचे पाणी
जर तुमच्याकडे फिल्टर नसेल किंवा तो खराब झाला असेल तर तुम्ही पावसाळ्यात पिण्याचे पाणी शुद्ध करण्यासाठी तुरटी वापरू शकता. तुम्हाला ते बाजारात अगदी सहज मिळेल. जर तुम्ही तुरटी वापरत असाल तर स्वच्छ सुती कपड्यात बांधून साठलेल्या पाण्यात टाका. पाणी पांढरे दिसायला लागल्यावर पाण्यातून तुरटी काढून भांड्यातील पाणी झाकून २-३ तास ​​सोडावे. या काळात कोणीही पाण्याचा वापर करू नये हे लक्षात ठेवा.